Nobel Prize 2019 Physiology And Medicine Winner: कॅन्सर ,ऍनिमिया वरील औषधांशी संबंधित शोधासाठी William G Kaelin Jr, Sir Peter J Ratcliffe , Gregg L Semenza यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान
William G Kaelin Jr, Sir Peter J Ratcliffe and Gregg L Semenza (Photo Credits: Academy)

नोबेल पुरस्कार (Nobel 2019) वैद्यकीय वर्गवारीत (Physiology And Medicine Nobel Winner) यंदाचे विजेते नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये अमेरिकीन वैज्ञानिक विलियम जी केलिन(William G Kaelin Jr) आणि ग्रेग एल सेमेंज़ा (Gregg L Semenza ) तसेच ब्रिटिश वैज्ञानिक पीटर जे रेटक्लिफ (Sir Peter J Ratcliffe) यांना संयुक्त रित्या हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. परीक्षकांच्या माहितीनुसार यातील शोधामुळे येत्या काळात कॅन्सर, ऍनिमिया तसेच अन्य अनेक व्याधींवर उपचार शोधणे शक्य होणार आहे त्यामुळे ही एक आश्वासक पायरी आहे.

या वैज्ञानिकांनी शरीरातील जनुके व ऑक्सिजनच्या बदलत्या प्रमाणानुसार त्यांच्यावर नियंत्रण करणाऱ्या मॉलेक्युलर मशिनरी आणि  आपल्या शरीरातील पेशी कशा प्रकारे ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार काम  करतात हे अभ्यासले आहे

ANI ट्विट

प्राप्त माहितीनुसार, या तिन्ही वैज्ञानिकांनी लावलेला शोध हा मानवी शरीरप्रक्रियेतील मूलभूत विषयावर आधारित आहे. आपण सारेच जाणतो की जगण्यासाठी ऑक्सिजन हा अत्यावश्यक आहे, त्याशिवाय काही सेकेंदाच्या वर मानवी शरीर काम करू शकत नाही. ऑक्सिजनच्या सततच्या बदलत्या प्रमाणातील टक्केवारी लक्षात घेत त्यावर काम करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास या तीनही वैज्ञानिकांनी केला आहे. हे प्रमाण नियंत्रित कसे ठेवायचे याबाबत माहिती मिळताच त्यामुळे परिणामी आजारांवर उपचार शोधणे शक्य होणार आहे.

या दिवशी  नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार

सोमवारी, 7 ऑक्टोबर - वैद्यशास्त्र

मंगळवार, 8 ऑक्टोबर - भौतिक शास्त्र

बुधवार, 9 ऑक्टोबर - रसायनशास्त्र

गुरुवार, 10 ऑक्टोबर - साहित्य

शुक्रवार, 11 ऑक्टोबर - शांतता

सोमवार, 14 ऑक्टोबर - अर्थशास्त्र

नोबेल पुरस्कार विजेत्या प्रत्येकाला जवळपास साडे चार कोटी रुपये रोख रुपये दिले जातात. तसेच 23 कॅरेट सोन्याचे 200 ग्रॅमचे पदक आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. पदक म्हणून नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांचा फोटो असलेले सोन्याचे पदक दिले जाते.