Mount Everest New Height: नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जगातील सर्वाधिक मोठा पर्वत म्हणून ओळखल्या जाणऱ्या माउंट ऐवरेस्टच्या नव्या उंचीचा खुलासा केला आहे. त्यानुसार माउंट ऐवरेस्टची नवी उंची 8848.48 मीटर मोजली गेल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर हिमालयाच्या पर्वताची सद्यची उंची 8848 मीटर असल्याचे मानली जाते. ही उंची 1954 रोजी सर्वे ऑफ इंडिया यांच्याकडून मोजण्यात आली होती. परंतु 2015 च्या भुकंपानंतर त्याच्या वास्तविक उंचीत बदलाव झाल्याचा अनुमान लावत नेपाळच्या सरकारने या उंच शिखराची उंची पुन्हा एकदा मोजण्याचा निर्णय घेण्यात आला.(बिहार: सीतामढ़ी जिल्ह्यातून 'माऊंट एव्हरेस्ट' चं दर्शन; प्रदुषण घटल्याने पहिल्यांदाच नागरिकांनी अनुभवला हिमालयाचा अद्भुत नजारा View Pics)
नेपाळ सरकारनच्या अधिकाऱ्यांनी चीनसोबत समन्वय साधत एक 30 सदस्यांची टीम तयार केली. त्यानुसार त्यांनी टीमला हिमालयाची उंची मोजण्यासठी पाठवले. ही टीम चोमोलुंगमा बेस कॅम्प येथून एव्हरेस्ट वर चढाई करण्यासाठी निघाले होते. एवरेस्टच्या शिखरावर पोहचून या टीमने ग्लोबल सॅटलाइट सिस्टिमच्या मदतीने जगातील या सर्वाधिक मोठ्या पर्वताची उंची मोजली गेली.(माऊंट एव्हरेस्ट येथून उचलला तब्बल 3000 किलो कचऱ्याचा साठा)
Tweet:
8848.86 metres is the newly-measured height of Mount Everest, Nepal's Foreign Minister announces. pic.twitter.com/Fnxh1liY98
— ANI (@ANI) December 8, 2020
या सर्वे टीमने नॅव्हिगेशन सॅटलाईट आणि ग्रॅवीमीटरच्या मदतीने माउंट एव्हरेस्टची उंची मोजली गेली. ही टीम एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चोमोलुंगमा बेस कॅम्पच्या येथे पोहचली होती. 1949 मध्ये आपल्या स्थापनेनंतर चीनच्या सर्वेक्षण टीमने आतापर्यंत 6 वेळा माउंट ऐव्हरेस्टवर चढाई केली आहे. चीनने 1975 आणि 2005 मध्ये माउंट एव्हरेस्टची नवी उंची घोषित केली होती. माउंट एव्हरेस्टची 1975 मध्ये उंची 8848.13 मीटर आणि 2005 मध्ये 8844.43 मीटर होती.