माऊंट एव्हरेस्ट येथून उचलला तब्बल 3000 किलो कचऱ्याचा साठा
प्रतिकात्मक फोटो (फोचो सौजन्य-ट्वीटर)

नेपाळने (Nepal) 14 एप्रिल पासून सफाई मोहिमेअंतर्गत माऊंट एव्हरेस्ट  (Mount Everest) येथील आतापर्यंत तब्बल 3000 किलो कचऱ्याचा साठा उचलला आहे. तर माऊंट एवरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर असल्याचे म्हटले जाते.

सोलुखुंबु जिल्ह्यातील खुंबु ग्रामीण पालिकेने सफाई मोहित 14 एप्रिल पासून सुरु केली. तर ही मोहित 45 दिवस सुरु राहणार असून आता पर्यंत एव्हरेस्ट  वरील 3000 किलो कचरा उचलण्यात आला आहे. नेपाळ येथे नववर्ष सुरु झाल्याच्या दिवसापासून या स्वच्छचा मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. तर येत्या 45 दिवसांच्या मोहिमेत 10 हजार किलो कचरा उचलण्याचे लक्ष ग्रामीण पालिकेने त्यांच्यासमोर ठेवले आहे.(Yeti Footprints: हिममानव 'यती'च्या पावलांचे ठसे मेकालू बेस कॅम्प जवळ आढळल्याचा भारतीय सैन्याचा दावा)

पर्यटन महासंचालक दांडू राज घिमरे यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. आता पर्यंत जमा करण्यात आलेल्या कचऱ्याच्या साठापैकी 2 हजार किलोचा कचरा काठमांडू येथे पाठवण्यात आला आहे. तसेच या मोहिमेअंतर्गत एव्हरेस्ट येथे पडलेले मृतदेहसुद्धा खाली आणण्यात आले आहेत. स्वच्छता मोहिमेत गावातील सर्वजण कसून कष्ट करत आहेत.