Yeti Footprints: हिममानव 'यती'च्या पावलांचे ठसे  मेकालू बेस कॅम्प जवळ आढळल्याचा भारतीय सैन्याचा दावा
Footprint of Yeti. (Photo Credits: Indian Army | Twitter)

मानवाचा पूर्वज समजला जाणारा 'यती'(Yeti) हा दोन पायांवर चालणारा अवाढव्य वानर असा होतो. काही पौराणिक कथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. मात्र इंडियन आर्मीने (Indian Army) 9 एप्रिल दिवशी नेपाळ - चीन सीमेवर मेकालू बेस कॅम्पजवळ (Makalu Base Camp)'यती'च्या पावलांचे ठसे आढळल्याचा दावा केला आहे.  इंडियन आर्मीने अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून याची माहिती देताना फोटोदेखील पोस्ट केला आहे.

काय आहे इंडियन आर्मीचं ट्विट

इंडियन आर्मीने केलेल्या ट्विटनुसार हिमालयाच्या पर्वातरांगांमध्ये 32X15 इंचाचे ठसे सापडले आहेत. अशा ठसांचा दावा पहिल्यांदाच इंडियन आर्मीकडून करण्यात आला आहे. गिर्यारोहण मोहिमा करणार्‍या आर्मीच्या पथकाकडून हा दावा करण्यात आला आहे.

मकालू बॅरन नॅशनल पार्कच्या परिसरात यापूर्वी अशाप्रकारे हिममानवाचं दर्शन झाल्याचा दावा करण्यात आला होता.