बिहार: सीतामढ़ी जिल्ह्यातून 'माऊंट एव्हरेस्ट' चं दर्शन; प्रदुषण घटल्याने पहिल्यांदाच नागरिकांनी अनुभवला हिमालयाचा अद्भुत नजारा (View Pics)
Himalaya Ranges| Photo Credits: Twitter/ @activistritu

भारतामध्ये कोरोना व्हायरसचं वाढत संकट पाहता लॉकडाऊन हा आता दीड-दोन महिन्यांपर्यंत लांबला आहे. याचा सामान्यांना त्रास होत असला तरीही प्रदुषणाच्या पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे. हवा अधिक शुद्ध झाली आहे. त्याचाच प्रत्यय बिहार मधील सीतामढी जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवता आला आहे. आता सीतामढी जिल्ह्यातून हिमालयाच्या पर्वतरांगांचं थेट दर्शन होत आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. सीतामढी मधील नागरिकांना माऊंट एव्हरेस्टचं असं दर्शन आणि निसर्गाचा अदभुत नजारा पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. Lockdown: उत्तर प्रदेश मधून पहिल्यांदाच दिसल्या हिमालयीन पर्वतरांगा; पहा व्हायरल फोटोज

बिहारमधून थेट भारत-नेपाळच्या सीमेवरील हिमालयाचं दर्शन होत असल्याने नागरिक खूष आहेत. अनेकजण हा नजारा फोटोमध्ये टिपत आहेत. सीतामढी पासून नेपाळच्या पहाडी भागामध्ये सुमारे 40-50 किलोमीटरचं अंतर आहे. काही तज्ञांच्या मते वातावरण स्वच्छ असेल तर एखाद्या उंच ठिकाणावरून सहज पर्वतरांगांचं दर्शन होऊ शकतं. सध्या अंदाजे 40% प्रदुषण कमी झालं आहे.

सोशल मीडियात हिमालयाच्या पर्वतरांगांचे फोटो

उत्तर प्रदेशमधील अनेक नागरिकांनी यापूर्वी अशाप्रकारे हिमालयाच्या पर्वतारांगांचं दर्शन झाल्याचे फोटो सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध केले होते. उत्तर भारतामध्ये हवेच्या प्रदुषणामध्ये जशी घट झाली आहे. तसंच जल प्रदुषण देखील घटलं आहे. काही दिवसांपूर्वी गंगा नदी प्रदूषणाच्या पातळी घट झाल्याने ऋषिकेश ते लक्ष्मण झुलापर्यंत वाहणार्‍या नदीच्या शुद्ध पाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अभिनेत्री दिया मिर्झाने हा व्हिडिओ शेअर केला होता.