हिमालयीन पर्वतरांगा (PC - Twitter)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. या लॉकडाऊनमुळे वातावरणात काही सकारात्मक बदलही होताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे हवेचा दर्जा सुधारत असून प्रदुषण कमी झाले आहे. याचा परिणाम म्हणजे उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधून पहिल्यांदाच हिमालयीन पर्वतरांगा दिसत आहेत. या हिमालयीन पर्वतरांगांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उत्तर प्रदेशमधील अनेक नागरिकांनी या पर्वत़रांगाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. भारतीय वन खात्यातील अधिकारी रमेश पांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हिमालयाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या ट्विटमध्ये रमेश पांडे यांनी सांगितलं आहे की, लॉकCडाउन आणि अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे हवेचा दर्जा सुधारला आहे. वसंत विहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या दुष्यंत यांनी आपल्या घरातून हे फोटो काढले आहेत, असंही पांडे यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Ramayan Funny Memes & Jokes: रामायण मालिकेच्या 'वर्ल्ड रेकॉर्ड' नंतर सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा वर्षाव!)

दरम्यान, भारतीय वन खात्याचे दुसरे एक अधिकारी परवीन कासवान यांनीदेखील पर्वतरांगांचे फोटो शेअर केले आहेत. यात त्यांनी सहारनपूर पासून या पर्वतरांगा 150 ते 200 किलोमीटर अंतरावर असल्याचं सांगितलं आहे. हिमालयीन पर्वतरांगांचे एवढ्या लांबच्या अंतरावरून घेतलेले फोटो नेटीझन्सच्या चांगलेच पसंतीस पडले आहेत.