Fishing | Representational image (Photo Credits: pxhere)

पारंपरीक पद्धतीने मच्छीमारी (Fishing) करुन कसेबसे पोट भरणाऱ्या एका मच्छीमाराचे भाग्य उजळले आहे. पाकिस्तानातील हा मच्छीमार रातोरात करोडपती (Fisherman Becomes Millionaire) बनला आहे. अरबी समुद्रात नेहमीप्रमाणे  मासेमारी करणाऱ्या या मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क दुर्मिळ मासा सापडला. ज्याला अनेक लोक 'गोल्डन फिश' (Golden Fish) किंवा 'सोवा' (Sowa Fish) म्हणूनही ओळखतात. औषधी गुणधर्म असलेल्या या माशाला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड किंमत आहे. पाकिस्तानातील इब्राहिम हैदरी गावात राहणाऱ्या हाजी बलोच नामक गरीब मच्छीमारास हा मासा सापडला. या माशाचा लिलाव करुन त्याने प्रचंड पैसे कमावले.

सोवा मासा हा अनमोल आणि दुर्मिळ

पाकिस्तानातील मच्छीमार लोक मंचाचे मुबारक खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, कराची बंदरामध्ये मच्छीमारांनी जेव्रा त्याच्या माशांचा लिलाव केला तेव्हा ते तब्बल 70 दशलक्ष रुपयांना विकले गेले. सोवा मासा हा अनमोल आणि दुर्मिळ मानला जातो. त्याच्या पोटातील पदार्थांमध्ये उत्तम अनेक औषधी गुणधर्म असतात. खास करुन माशाच्या पोटात असलेला धाग्यासारखा पदार्थ शस्त्रक्रियेमध्ये वापरला जातो. हा मासा साधारण 20 ते 40 किलो वजनाचा असतो. त्याची लांबा सरासरी 1.5 मीटर इतकी असते. हा मासा पूर्व आशियाई देशांमध्ये प्रामुख्याने आढळतो.

सोनेरी माशांचा हा मोठा साठा

सोवा माशाला सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्वदेखील आहे. पूर्वीपासून त्याचा समावेश पारंपरिक औषधे आणि स्थानिक नागरिकांच्या पाककृतींमध्येही झाल्याचे आढळून येते. हाजी बलोच नावाच्या या मच्छीमाराने सांगितले की, कराचीच्या खुल्या समुद्रात आम्ही मासेमारी करत होतो. जेव्हा आम्हाला सोनेरी माशांचा हा मोठा साठा सापडला तो क्षण आमच्यासाठी प्रचंड वादळी होता. आम्हाला प्रचंड आनंद झाला होता. हाजीने सांगितले की, मासेविक्रीतून मिळालेला नफा तो त्याच्या बोटीवरील खलाशांसोबत वाटून घेईल. सांगितले जाते की, गोल्डन फीश कास करुन त्यांच्या प्रजननाच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर येतात.

सोवा माशांच्या प्रजाती खोल समुद्रात आढळतात

उपलब्ध माहतीनुसार, सोवा माशांच्या या जाती खोल समुद्रात राहतात आणि केवळ प्रजनन हंगामात किनारपट्टीवर येतात. या माशामध्ये काही विशिष्ट खनिजे असतात. जी त्याच्या छाती आणि पोटात आढळून येतात. ही खनीचे प्रामुख्याने औषधे तयार करण्यासाठी वापरली जातात. ग्वादर डेव्हलपमेंट अथॉरिटी (GDA) चे वरिष्ठ अधिकारी आणि पर्यावरण तज्ञ, श्री अब्दुल रहीम यांनी माध्यमांना सांगितले की, स्थानिक मच्छीमारांनी गेल्या वर्षी याच जातीचे 10 पेक्षा जास्त मासे पकडले होते, ज्यांची 10 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त किमतीत विक्री झाली होती. ते पुढे म्हणाले, हा मासा स्थानिक मच्छीमारांकडून विकत घेतला जातो आणि कराचीला नेला जातो जिथे तो आणखी चांगल्या किंमतीला विकला जातो.