Worli Fisherman Work From Home (Photo Credits: Facebook/ Bharat More)

देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सर्वात मोठा फटका हा महाराष्ट्राला (Maharashtra) बसला आहे, त्यातही मुंबई (Mumbai) मधील कोरोना रुग्णनाची संख्या ही राज्याच्या तुलनेत निम्मी आहे. मुंबईतील वरळी (Worli) भागात आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने हा भाग काही दिवसांपासून सील करण्यात आला होता. मात्र अशा वेळी येथील स्थानिक रहिवासी मासेमारी (Fisherman) करणाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. साहजिकच घरातून बाहेर पडणे शक्य नसल्याने मासेमारीला सुद्धा जाता येत नाही. अशावेळी एका मच्छिमाराने आपल्या बुद्धीचा वापर करून वर्क फ्रॉम होम (Work From Home)  चा मार्ग अवलंबला आहे. मासेमारी करण्यासाठी कसलं वर्क फ्रॉम होम असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होणार हा एक व्हिडीओ (Viral Video) तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देईल.  Coronavirus पासून वाचण्यासाठी Work From Home करताय तर 'या' गोष्टींची घ्या काळजी अन्यथा होऊ शकते नुकसान

वरळी मधील एक मच्छीमार आपल्या घरातून समुद्रात भरतीच्या वेळी गळ टाकून मासे पकडत असल्याचा व्हिडीओ सध्या फेसबुक वर पाहायला मिळत आहे. भारत मोरे या अकाऊंटवरून हा व्हिडीओ सुरुवातीला शेअर करण्यात आला होता. या व्यक्तीचे घर समुद्राला लागून असल्याने हे शक्य होत आहे.अशा पद्धतीने त्यांनी थोडेथोडके नव्हे तर चांगले बादलीभर मासे पकडले आहेत.

पहा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान,काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील रुग्णांची आकडेवारी पाहता लॉक डाऊनचा कालावधी हा 14 एप्रिल पासून पुढे नेत 30 एप्रिल पर्यंत लागू ठेवण्याची घोषणा केली आहे. अशावेळी शेतकरी, मच्छीमार यांना लॉक डाऊन काळात सुद्धा काम करण्याची मुभा आहे. मात्र वरळी मधील  परिस्थिती पाहता येथील मच्छीमारांना ही मुभा दिली  जाते का हे पाहावे लागेल. वरळी परिसर हा कोळी आणि मासेमार व्यवसायातील लोकांसाठी महत्वाचा आहे. मासेविक्रीसाठी हा भाग प्रसिद्ध आहे.