Coronavirus पासून वाचण्यासाठी Work From Home करताय तर 'या' गोष्टींची घ्या काळजी अन्यथा होऊ शकते नुकसान
Work From Home (Photo Credits: Needpix)

COVID-19 च्या पार्श्वभूमीवर शाळा (School), महाविद्यालये (College), अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही ऑफिसेसही बंद ठेवण्यात असून कर्मचा-यांना Work From Home ची सुविधा देण्यात आली आहे. कोरोना व्हायरस सारख्या महाभयाण संकटाला सामोरे जाण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच नागरिक सज्ज झाले आहेत. मात्र हे सर्व करत असताना कोणत्याही कर्मचा-याचे तसेच कंपनीचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी Work From Home ही सुविधा देण्यात आली आहे. मात्र हे करत असताना देखील कर्मचा-यांनी काही गोष्टी लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.

work From Home ही सुविधा लॅपटॉप, मोबाईल किंवा संगणकावर काम करणा-या कर्मचा-यांना देण्यात आली आहे. त्यामुळे हे करत असताना पुढील गोष्टी ध्यानात ठेवा

1. लॅपटॉप, मोबाईल ची चार्जिंग फुल आहे की नाही ते नीट तपासा. तसेच त्यांचा चार्जर ही जवळ ठेवा.

2. लॅपटॉप, संगणकावर काम करत असताना डेटा सेव्ह करत रहा अन्यथा स्वत:ला ईमेल करुन त्याचा बॅकअप ठेवा. (जर घरात लहान मुळे असतील तर न विसरता हे काम करा) घरातून काम करण्यासाठी वेबडेटा सारख्या शेअर ड्राईव्हचा वापर करा. ज्यामुळे आवश्यक माहिती ठेवता येईल. म्हणजे इतर कर्मचारीसुद्धा आवश्यकतेनुसार ते डेटा वापरू शकतात. पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IT कंपन्यांच्या 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना; पुण्यात आढळले राज्यातील पहिले कोरोना बाधित रुग्ण

3. लॅपटॉप, संगणकाला पासवर्ड ठेवून ते सुरक्षित ठेवा. तसेच मोबाईल लहान मुलांपासून दूर ठेवा अन्यथा त्यांच्याकडून वारंवार चुकीचा पासवर्ड टाकल्याने मोबाईल लॉक होऊ शकतो.

4. जर तुमची स्वतंत्र खोली असेल तर ही सर्व उपकरणे तिथेच ठेवून तेथेच तुमचे ऑफिसचे काम करा. बंगळुरू: गुगलच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण; कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या 'वर्क फ्रॉम होम' च्या सुचना

5. व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा कॉल करुन ऑफिसच्या सहकर्मचा-यांशी किंवा ज्येष्ठांशी संभाषण करायचे असेल एका वेगळ्या खोलीत जाऊन करा. घरातील नेट स्पीड व्यवस्थित आहे की नाही ते नीट तपासा.

यासोबतच स्वत:च्या आरोग्याचाही काळजी घ्या. नियमितपणे हात धुणे विसरू नका. त्याचबरोबर घरी काम करताना मास्कचा वापर करा. तुम्ही काम करत असलेली जागा रोज साफ करा, ज्यामुळे विषाणूचा संसर्ग होणार नाही. त्याचबरोबर लॅपटॉप, कम्पूटर यांचा साफ करूनच वापर करा.