Google Employee Infected With Coronavirus: कोरोना व्हायरचा (Coronavirus) प्रादुर्भाव टाळण्यासाठी गुगलच्या बंगळुरू कार्यालयातील (Bengaluru Google Office) कर्मचार्यांना उद्यापासून घरातून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुगलच्या बंगळूरु कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची (COVID-19) लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. हा कर्मचारी काही तास बेंगळुरू कार्यालयात होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जगभरातील शंभर देशांना कोरोना व्हायरसचा विळखा बसला आहे. गुगलच्या बंगळुरू ऑफिसमधील एका कर्मचाऱ्यामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर हा कर्मचारी ऑफिसमध्ये आला होता. या रुग्णाची चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे गुगल कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना शनिवारपासून घरातून काम करण्यास सांगितलं आहे. (हेही वाचा - Coronavirus ने बदलली अभिवादन करण्याची पद्धत, US अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि Ireland पंतप्रधान लियो वराडकर यांनी एकमेकांना केले 'नमस्ते')
Google: Out of an abundance of caution, we are asking employees in that Bengaluru office to work from home from tomorrow. We have taken & will continue to take necessary precautionary measures, following the advice of public health officials. https://t.co/RJo2FIkRwm
— ANI (@ANI) March 13, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात सुमारे 73 कोरोना बाधित रूग्ण आहेत. भारतात कोरोना व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथे 76 वर्षीय वृद्धास कोरोना व्हायरस लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच या वृद्धाचा मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा मृ्त्यू संशयास्पद मानला जात होता. परंतु, एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटकच्या आरोग्य विभागाने या वृद्धाचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळेचं झाला असल्याला दुजोरा दिला आहे. देशभरातील विविध राज्यांत कोरोना व्हायरसची झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.