COVID Vaccine Shortage असताना दोन डोस मधील अंतर वाढवणं Reasonable Approach, प्रभाव कमी होत नसल्याची Dr Anthony Fauci ची प्रतिक्रिया
Anthony Fauci (Photo Credits: Getty Images)

भारतामध्ये कोरोना वायरसच्या दुसर्‍या लाटेमधील संक्रमण कमी करण्यासाठी तसेच आगामी तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण वेगवान करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे कालच सरकारने कोविशिल्डच्या (Covishield) दोन डोस मधील अंतर 6-8 आठवड्यांवरून 12-14 आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता या निर्णयाला अमेरिकेचे Infectious Disease Expert Dr Anthony Fauci यांनी देखील पाठिंबा दिला आहे. ANI वृत्तसंस्थेसोबत बोलताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तुमच्याकडे लसींच्या डोसचा तुटवडा आहे तेव्हा त्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोस मधील अंतर वाढवणं हा पर्याय योग्य आहे. त्यामुळे लसीचा प्रभाव कमी होत नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान Dr Anthony Fauci यांनी काही दिवसांपूर्वी भारतातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येवरून चिंता व्यक्त केली होती. त्यांनी भारताला सध्याच्या परिस्थितीमधून मार्ग काढताना काही तात्काळ आणि काही दुरगामी प्रभावी ठरणारे निर्णय घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी लॉकडाऊन, लसीकरणाचा वेग वाढवण्याचा तसेच फिल्ड हॉस्पिटलची गरज बोलून दाखवली होती.

ANI Tweet

भारतामध्ये सध्या लसींचा तुटवडा पाहता राज्य सरकारने 18-44 वयोगटातील लसीकरण थांबवले आहे आणि 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याला प्राधान्य दिले आहे. यामध्येही लसीचा दुसरा डोस देण्यासकडे प्राधान्य असल्याचं सांगितलं जात आहे. देशात एकूण 17 कोटीच्या वर कोविड 19 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Dr Anthony Fauci यांनी ANI च्या मुलाखतीमध्ये वॅक्सिन पासपोर्ट बद्दल बोलताना सरसकट हा निर्णय घेता येणार नाही असे देखील म्हटलं आहे. कारण हे इंफेक्शन वर देखील अवलंबून आहे. भारतामध्ये सध्या कोरोनाचा प्रभाव अधिक आहे त्यामुळे आता तेथे प्रवासाला मंजुरी देणं कठीण आहे. पण सधन देशांनी लसनिर्मिती आणि त्याच्या वाटपासाठी मदतीचा हात पुढे करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

कोविशिल्ड प्रमाणेच British study चा दाखला देत Reuters ने देखील Pfizer च्या लसीचा दुसरा डोस हा 12 आठवड्यांच्या फरकाने दिल्यास अ‍ॅन्टीबॉडीजचा प्रतिसाद सुमारे साडेतीन पट अधिक प्रभावी होत असल्याचंही म्हटलं आहे.