China Landslide: चीनच्या युनान प्रांतात भूस्खलन, 47 लोक ढिगाऱ्याखाली अडकले

चीनच्या युनान प्रांतात मोठी दुर्घटना ही घडली आहे. युनान प्रांतात (Yunnan Province) भूस्खलन (Landslide Updates) होऊन सुमारे 40 हून अधिक जण गाडले गेले आहेत. चीनमधील स्थानिक वृत्तपत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. चिनी वृत्तांनुसार युनान प्रांतात सोमवारी 18 घरे गाडली केली ज्यामध्ये अनेक जण बेपत्ता झालेत तर 200 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. (हेही वाचा - China’s Population Declines for 2nd Straight Year: China ची सलग दुसर्‍या वर्षी लोकसंख्येमध्ये घट कायम; भारत पहिल्या स्थानीच)

पाहा पोस्ट -

दक्षिण-पश्चिम चीनच्या युनान प्रांतात झालेल्या भूस्खलनात 44 लोक गाडले गेले. 18 वेगवेगळ्या घरांमधील दबल्या गेलेल्या पीडितांना शोधण्यासाठी बचाव प्रयत्न सुरू आहेत. या भूस्खलनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी 33 अग्निशमन वाहने आणि 10 लोडिंग मशीनसह 200 हून अधिक बचाव पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

झेनजियांग काउंटीमधील तांगफांग शहरामध्ये हा परिसर आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. भूस्खलनात 18 घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचं सांगितलं जात आहे. दुर्घटनाग्रस्त भागातून अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं प्रयत्न सुरू आहेत. भूस्खलन होण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.