राज्यात अन्नपदार्थांची घरपोच सेवा (ऑनलाईन) देत असलेल्या कंपन्यांच्याबाबत नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी विभागाकडून लवकरच टोल फ्री क्रमांक घोषित करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. विधान परिषद सभागृहात अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत लक्षवेधी सदस्य संदीप जोशी यांनी मांडली होती. मंत्री झिरवाळ म्हणाले, राज्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 नियम व नियमने मधील तरतुदींनुसार नियमानुसार झेप्टो, स्वीगी, झोमॅटो इत्यादी कंपन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. एकूण 43 अन्न ई-कॉमर्स आस्थापनांपैकी सखोल तपासणी दरम्यान अस्वच्छता तसेच गोदामात मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आले.

या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे. 34 अन्न आस्थापनांना त्रुटींच्या सुधारणा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. एक परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पाच अन्न आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्री झिरवाळ म्हणाले, ई-कॉमर्स आस्थापना या केंद्रीय परवानाधारक आस्थापना असून सदर आस्थापनांच्या गोदामांसाठी राज्याचा परवाना देण्यात येतो. या गोदामांच्या तपासण्या वाढविण्यात येत आहेत. (हेही वाचा: Srisailam Laddoo Controversy: श्रीशैलम मंदिरातील लाडू प्रसादात मृत झुरळ; भक्ताकडून आरोप, Video Viral)

Food E-commerce Companies:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)