Building Collapse In Shimla (फोटो सौजन्य - X/@iNikhilsaini)

Building Collapse In Shimla: हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सोमवारी सकाळी राजधानी शिमला (Shimla) येथील भट्टाकुफर भागात एक 5 मजली घर पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळले. चाम्याना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मथु कॉलनीमध्ये ही दुर्घटना घडली. ही इमारत धोकादायक असल्याने ती खूप पूर्वीच रिकामी करण्यात आली होती. सुदैवाने, ज्या वेळी हे घर कोसळले तेव्हा त्यात कोणीही राहत नव्हते. त्यामुळे कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

स्थानिक लोकांच्या मते, हे घर बराच काळ रिकामे पडले होते आणि जीर्ण अवस्थेत होते. अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी जमले. स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. इमारतीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, परिसरातील अशा जीर्ण इमारती ओळखल्या जात आहेत जेणेकरून वेळीच योग्य पावले उचलता येतील आणि भविष्यात अशा घटना टाळता येतील. (हेही वाचा - Stray Cow Attack In Nashik: धक्कादायक! नाशिकमध्ये भटक्या गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी (Watch Video))

शिमलामध्ये 5 मजली इमारत पत्त्यांच्या घरासारखी कोसळली, पहा व्हिडिओ - 

कुल्लू आणि मंडीमध्ये मुसळधार पाऊस -

दरम्यान, शिमलासह, कुल्लू आणि मंडी येथे गेल्या 24 तासांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे, ज्यामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. हवामान खात्याने जारी केलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे, मंडी जिल्ह्यातील बियास नदीवरील लार्जी आणि पांडोह या दोन्ही धरणांचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत.