Stray Cow Attack In Nashik: धक्कादायक! नाशिकमध्ये भटक्या गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी (Watch Video)

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेने शहरात पुन्हा एकदा भटक्या गुरांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. व्हिडिओमध्ये गाय एका वृद्धावर वारंवार हल्ला करताना दिसत आहे.

Stray Cow Attack In Nashik: धक्कादायक! नाशिकमध्ये भटक्या गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी (Watch Video)
Stray Cow Attack In Nashik (फोटो सौजन्य - X/@News18lokmat)

Stray Cow Attack In Nashik: नाशिकमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. नाशिकमधील कळवण-ओतूर रोडवर सोमवारी सकाळी एका भटक्या गायीने हल्ला (Stray Cow Attack) केल्याने एका निवृत्त महसूल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तसेच गायीच्या हल्ल्यात आणखी एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेने शहरात पुन्हा एकदा भटक्या गुरांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. व्हिडिओमध्ये गाय एका वृद्धावर वारंवार हल्ला करताना दिसत आहे. तसेच स्थानिक नागरिक गायीला तेथून हकळून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख भालचंद्र रघुनाथ मालपुरे असे असून ते 79 वर्षांचे होते. मालपुरे हे महसूल विभागातील निवृत्त पुरवठा अधिकारी होते. व्हिडिओमध्ये सकाळी 11 वाजताच्या सुमारास कळवणमधील जुना ओतूर रोडवरील छत्रपती मंगल कार्यालयाजवळ मालपुरे त्यांच्या दुचाकीवरून उतरले. यावेळी जवळच अनेक गायी उभ्या होत्या. त्यापैकी एक गाय अचानक आक्रमक झाली आणि त्यांच्यावर हल्ला करू लागली. (हेही वाचा -Doctor Beats Adopted Daughter With Stick: शिमलामध्ये डॉक्टराची 10 वर्षांच्या दत्तक मुलीला काठीने बेदम मारहाण (Watch Video))

नाशिकमध्ये गायीचा वृद्धावर हल्ला, पहा व्हिडिओ -

दरम्यान, गायीने मालपुरे यांना शिंगांनी उचलले आणि पायाखाली तुडवले. तथापी, बापू आहेर आणि आबा कानडे यांच्यासह स्थानिकांनी काठ्यांनी गायींना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरीदेखील गाय तेथून जात नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. मालपुरे यांच्या छातीत आणि पोटात जखमा झाल्या. स्थानिकांनी मालपुरे यांना रुग्णालयात नेले जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Pet Dog Beaten By Servant In Versova: वर्सोवामध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये नोकराची पाळीव कुत्र्याला बेदम मारहाण; घटना CCTV मध्ये कैद)

गायीच्या हल्ल्यात एकजण जखमी -

याशिवाय, गायीच्या हल्ल्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे निवृत्त चालक आबा मोरे देखील जखमी झाले. मदत करण्याचा प्रयत्न करताना गायीने त्यांच्यावर हल्ला केला. स्थानिकांनी त्यांला उपचारासाठी रुग्णालयात नेले. या घटनेनंतर, पोलिस, महापालिका अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाने चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2025 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).