
Doctor Beats Adopted Daughter With Stick: हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला (Shimla) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंदीगडच्या एका डॉक्टरने 10 वर्षांच्या निष्पाप मुलीला बेदम मारहाण (Doctor Beats Adopted Daughter) केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील शिमला येथील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ गेल्या आठवड्यात 14 जूनचा आहे. या व्हिडिओमध्ये पीजीआयचा एक डॉक्टर आपल्या मुलीला काठीने मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओ समोर येताच शिमला पोलिसांकडून डॉक्टरांना जाब विचारण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीला या जोडप्याने दत्तक घेतले होते. ही घटना शिमला येथील एका नातेवाईकाच्या घरी राहत असताना घडली. डॉक्टर जोडप्याने या मुलीला तीन वर्षांची असताना दत्तक घेतले होते. हे कुटुंब चंदीगडच्या सेक्टर 15 मध्ये राहते. मुलीला मारहाण केल्याचा व्हिडिओ शिमला येथीलच एका शेजाऱ्याने गुप्तपणे रेकॉर्ड केला होता. यानंतर, या प्रकरणाची तक्रार चाइल्ड हेल्पलाइन नंबरवर करण्यात आली, ज्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली. (हेही वाचा - Pet Dog Beaten By Servant In Versova: वर्सोवामध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये नोकराची पाळीव कुत्र्याला बेदम मारहाण; घटना CCTV मध्ये कैद)
पोलिसांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. व्हिडिओमध्ये आरोपी मुलीला काठीने मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या दरम्यान, ती स्वतःला वाचवण्यासाठी खोलीत इकडे तिकडे धावत आहे. आरोपीसोबत घटनास्थळी एक महिला देखील उपस्थित आहे. या दरम्यान, आणखी एक व्यक्ती खोलीत येते आणि मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करते. तथापि, डॉक्टर मुलीला मारहाण करत राहतो. व्हिडिओमध्ये मुलीचा ओरडण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. (हेही वाचा - Mumbai Local Ladies Coach Fight Video: मुंबई लोकल मध्ये महिलांच्या डब्ब्यात झिंज्या उपटत तुंबळ मारहाणीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाकडू तपास सुरू)
डॉक्टरची दत्तक मुलीला मारहाण -
शिमला में दिल दहला देने वाली घटना!
एक डॉक्टर ने अपनी 10 साल की गोद ली हुई बेटी को डंडे से बेरहमी से पीटा, वीडियो वायरल होने के बाद पुलिस और CWC ने जांच शुरू की है। #HimachalPradesh #shimla @shimlapolice @chandigarhpolice pic.twitter.com/wuGr8T43jy
— Rahul (@rahuljuly14) June 21, 2025
दरम्यान, घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, चंदीगड प्रोटेक्शन फॉर चाइल्ड राईट्सच्या अध्यक्षा शिप्रा बन्सल यांनी स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात चंदीगड आणि हिमाचल पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. तसेच, बाल कल्याण समितीने (CWC) देखील तपास सुरू केला आहे. तथापी, डॉक्टर दाम्पत्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. घटनेनंतर, मुलीच्या सुरक्षिततेबद्दलही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.