'महाराष्ट्राचे चेरापुंजी' ओळख असलेल्या आंबोली घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलतं. धुके आणि हिरवळ पाहण्यासाठी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, परंतु पर्यटकांच्या वाढत्या गर्दीत बेफिकीर पर्यटकही अनेक गोष्टींचा विचका करतात. कर्नाटकातील तरुणांच्या एका गटाने मुख्य धबधब्याजवळ अरुंद रस्त्याच्या मधोमध त्यांची गाडी थांबवून, मोठ्या आवाजात गाणी वाजवून, चालत्या गाड्यांवर नाचून आणि ओरडून सार्वजनिक उपद्रव निर्माण केला, ज्यामुळे इतर पर्यटक आणि स्थानिकांना मोठी गैरसोय झाली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तरुण पुढे जात असताना गाडीवर नाचत हुल्लडबाजी करताना दिसत आहे. नक्की वाचा:  देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाटावर जाण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मनाई; पावसाळ्यात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय.  

आंबोली घाटात तरूणांची हुल्लडबाजी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)