Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

2023 मध्ये चीनची लोकसंख्या घटण्याचा वेग वाढला असल्याची माहिती आज (17 जानेवारी) देण्यात आली आहे. सहा दशकांहून अधिक वाढीनंतर खाली येणारी चीनची लोकसंख्या आता demographic crisis चा सामना करत आहे. मागील वर्षी सर्वाधिक लोकसंख्येच्या देशाच्या यादीत भारताने चीनला मागे टाकले आहे.  देशात दर 1,000 लोकांमागे 6.39 जन्म नोंदवले गेले, जे एका वर्षापूर्वी 6.77 वरून कमी झाले. 1949 मध्ये कम्युनिस्ट चीनच्या स्थापनेनंतरचा जन्मदर हा सर्वात कमी आहे.

बीजिंगच्या National Bureau of Statistics (NBS) ने बुधवारी सांगितले की, "2023 च्या अखेरीस, राष्ट्रीय लोकसंख्या 1,409.67 दशलक्ष होती.2022 च्या अखेरीस त्यापेक्षा 2.08 दशलक्षने घट झाली आहे." चीनच्या आकडेवारीनुसार, त्यांची लोकसंख्या 140 कोटी म्हणजेच 1.409 अब्ज आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 20 लाख कमी आहे. तर भारताची लोकसंख्या 142 कोटी म्हणजे 1.425 अब्ज आहे.

मागील वर्षीची घसरण 2022 मधील नोंदवलेल्या घसरणीपेक्षा दुप्पट होती, जेव्हा देशाने 850,000 लोक गमावले कारण 1960 नंतर प्रथमच लोकसंख्या कमी झाली. "2023 मध्ये, जन्मदर 6.39 प्रति हजारासह 9.02 दशलक्ष होता," NBS ने बुधवारी सांगितले की, 2022 मध्ये 9.56 दशलक्ष जन्म झाला.

चीनने 2016 मध्ये 1980 च्या दशकात देशात असलेल्या अधिक लोकसंख्येच्या भीतीने लागू केलेली "one-child policy" बंद केली आणि 2021 मध्ये जोडप्यांना तीन मुले होऊ द्यायला सुरुवात केली.

परंतु आर्थिक वाढीचा चालक म्हणून आपल्या अफाट कर्मचार्‍यांवर अनेक वर्ष विसंबून राहिलेल्या देशाची demographic decline मागे घेण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. China Ban On iPhone: अॅपलला मोठा झटका! चीनने सरकारी अधिकाऱ्यांना आयफोन वापरण्यास घातली बंदी .

अनेकांनी घटत्या जन्मदराला राहणीमानाचा वाढता खर्च तसेच महिलांचे कामाला जाणं आणि उच्च शिक्षण घेण्याकडे असलेला अधिक कल याला जबाबदार धरले आहे.