iPhone प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credit - Twitter)

China Ban On iPhone: आयफोन बनवणारी कंपनी अॅपलला चीनने मोठा धक्का दिला आहे. चीन सरकारने सरकारी अधिकाऱ्यांना आयफोन (iPhone) वापरण्यास बंदी घातली आहे. Apple साठी ही वाईट बातमी आहे, कारण चीन ही कंपनीसाठी सर्वात मोठी परदेशी बाजारपेठ आहे. 2022 मध्ये, कंपनीच्या उत्पन्नापैकी 18% उत्पन्न चीनमधून आले होते. चीने सरकारी अधिकाऱ्यांसाठी अॅपल फोन बॅन केल्यानंतर अॅपलचा स्टॉक कमी झाला असून मार्केट कॅप सुमारे 200 डॉलर बिलियनने कमी झाले आहे.

चीन सरकारचा हा निर्णय अॅपलसाठी अतिशय परिणामकारक आहे. कारण कंपनीची बहुतांश उत्पादने चीनमध्ये तयार केली जातात आणि फॉक्सकॉन ही कंपनी तेथील सर्वात मोठी पुरवठादार आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, बीजिंगने केंद्र सरकारच्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात आयफोन आणू नयेत असे निर्देश दिले आहेत. याशिवाय त्याचा उपयोग अधिकृत कामातही करू नये. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, बंदीचा हा निर्णय सरकारी मालकीच्या कंपन्यांमध्येही लागू केला जाऊ शकतो. (हेही वाचा - North Korean Hackers: उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी ऑनलाइन कॅसिनोमधून चोरले $41 दशलक्ष क्रिप्टो- Reports)

डब्ल्यूएसजेच्या अहवालानुसार, बंदीचा निर्णय केवळ अॅपलवरच घेण्यात आलेला नाही. सर्व परदेशी ब्रँड्सवर बंदी घालण्यात आली आहे. विशेषत: आयफोनवर, ही बंदी अनेक एजन्सीमध्ये काम करणाऱ्या लोकांवर आधीच लागू करण्यात आली आहे. आता या बंदीचा विस्तार करण्यात आला आहे.

अॅपलसाठी बंदीचा हा निर्णय खूप मोठा आहे कारण कंपनी उत्पादन आणि विक्री दोन्हीसाठी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मात्र, कंपनीने आता भारतातही उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. बँक ऑफ अमेरिकाच्या विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, अॅपलवरील बंदीमागे Huawei असू शकते. अलीकडेच Huawei ने हाय-एंड तंत्रज्ञान स्मार्टफोन Mate 60 Pro लॉन्च केला आहे. अमेरिकन सरकारने या स्मार्टफोनची चौकशी सुरू केली आहे. वास्तविक, या फोनमध्ये SMIC ची प्रगत 7nm चिप आहे. अमेरिकेने चिनी चिपवर बंदी घातली आहे.