उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी या आठवड्यात ऑनलाइन कॅसिनो आणि स्पोर्ट्स बेटिंग साइटवरून जवळपास $41 दशलक्ष किमतीची क्रिप्टोकरन्सी चोरली आहे. रशियाशी अपेक्षित शस्त्रास्त्र करार होण्याआधी देशाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला चालना देण्यासाठी या पैशांचा वापर केला जाईल अशी चिंता अधिकाऱ्यांना वाटते. एफबीआयने बुधवारी जाहीर केले की, त्यांना आढळले आहे की, उत्तर कोरिया आणि त्याच्या राज्य-प्रायोजित लाझारस ग्रुपने पुन्हा Stake.com हॅक केले आहे. या गटाने गेल्या वर्षभरात $200 दशलक्ष पेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सी चोरल्या आहेत. 2022 मध्ये, ब्लॉकचेन अॅनालिटिक्स कंपनी चैनॅलिसिसने क्रिप्टो व्यवसायातून तब्बल $3.8 अब्ज चोरल्याचे आढळले होते. अलिकडच्या वर्षांत, उत्तर कोरियाद्वारे क्रिप्टोकरन्सी-संबंधित व्यवसायांवर सायबर हल्ले मोठ्या प्रमाणात झाले आहेत.

अमेरिकेच्या अधिकार्‍यांसाठी आणखी चिंतेची बाब म्हणजे उत्तर कोरियाचे नेते किम जंग-उन यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी अपेक्षित भेट होण्याच्या काही दिवस आधी ही चोरी घडली आहे. या दोन देशांमध्ये, युक्रेनवर चालू असलेल्या आक्रमणात रशियाला मदत करण्यासाठी शस्त्रास्त्रांचा करार होणे अपेक्षित आहे. (हेही वाचा: Cyber Security Project: राज्यात सायबर सुरक्षेसाठी उभा राहणार 837 कोटींचा प्रकल्प; 24 तास कार्यरत कॉल सेंटर, जाणून घ्या वैशिष्ट्ये)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)