Bitcoin Crashes: क्रिप्टो गुंतवणूकदारांना झटका; बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण

क्रिप्टोकरन्सीच्या जगात मोठा भूकंप झाल्याचे पहायला मिळत आहे. बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. बिटकॉइनची किंमत जवळपास 10% ने घसरून 56,875 डॉलरवर आली आहे.

Bitcoin Crashes: क्रिप्टो गुंतवणूकदारांना झटका; बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण
Photo Credit -X

Bitcoin Crashes: बिटकॉइन(Bitcoin)च्या किमतीतील चढ-उतार हे काही नवीन नाही. क्रिप्टोकरन्सी मार्केट त्याच्या अस्थिरतेसाठी ओळखले जाते. परंतु, अलीकडच्या काळात बिटकॉइनची ही घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब आहे. बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. बिटकॉइनची किंमत (Bitcoin Price) जवळपास 10% ने घसरून 56,875 डॉलरवर आली आहे. त्यामुळे गुतवणुकदार चांगलेच चिंतेत अडकले आहेत. येत्या काही दिवसांत बिटकॉइनच्या किमती कितीवर पोहोचतील हे पाहणे गरजेचे आहे. (हेही वाचा :Bitcoin: बिटकॉइन म्हणजे काय? कशी होते गुंतवणूक? कशी वाढते पैशांची किंमत? )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 01, 2024 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).