जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा कहर आहे. त्यातून दुनिया अद्यापही सावरली नाही. भारतासह देशभरातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. गुंतवणूकदार चिंतेतत आहेत. अशात बिटकॉइन गुंतवणूक (Bitcoin Investment) पर्याय ठरु शकतो का? याबाबतही काही लोक विचार करतात. इथे आम्ही आपल्याला बिटकॉइन (Bitcoin) गुंतवणूक करण्याबातब सल्ला देत नाही. अथवा तसे सूचवत नाही आहोत. परंतू, बिटकॉइन म्हणजे काय? (What is Bitcoin) त्यात गुंतवणूक कशी होते. त्यात गुंतवलेल्या गुंतवणूकीचे अथवा पैशांचे मूल्य (Value Of Bitcoin) कसे वाढते याबाबत माहिती देत आहोत. आपल्याला माहिती असेलच भारतात बिटकॉइन गुंतवणूक विश्वासार्ह मानली जात नाही. भारत सरकार, अथवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भारतात बिटकॉइन गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही.
बिटकॉइन म्हणजे काय?
बिटकॉइन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आहे. इंग्रजीमध्ये 'क्रिप्टो' या शब्दाचा अर्थ गुप्त असा आहे. ही एक प्रकारची डिजिटल करन्सी आहे. जी क्रिप्टोग्राफी नियमांनुसार चालते आणि संचलित केली जाते. क्रप्टोग्राफी चा अर्थ कोडिंग भाषेची उकल करण्याची कला असाही सांगितला जातो. बिटकॉइन आपण चलनाप्रमाणे प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही. तसेच त्याला हातही लावू शकत नाही. कारण बिटकॉइन पूर्णपणे डिजिटल करन्सी आहे. याला विकेंद्रीकृत डिजिटल करन्सी असेही म्हणतात. (हेही वाचा, क्रिप्टोकरन्सीवरील बंदी उठवण्याचे सर्वोच्च न्यायालयचे आदेश)
बिटकॉइन किती सुरक्षीत?
जगभरातील अनेक देशांनी बिटकॉइन असुरक्षीत मानला आहे. त्यामुळे बिटकॉइन अधिकृतरित्या व्यवहारात स्थान मिळवू शकला नाही. जगभरातील काही राष्ट्रांनी बिटकॉइनला अधिकृत दर्जा दिला आहे. (हेही वाचा, देशातील पहिल्या बिटकॉइन 'एटीएम'ला टाळा; संचालकाची पाठवणी तुरुंगात)
बिटकॉइन 'वैध' मानणारे प्रमुख देश
- जपान ( Japan)
- अमेरिकेची संयुक्त संस्थान (The United States)
- दक्षिण कोरिया (South Korea)
- जर्मनी (Germany)
- ऑस्ट्रेलिया (Australia)
बिटकॉइन 'अवैध' मानणारे प्रमुख देश
- चीन (China )
- बोलिव्हिया (Bolivia)
- कोलंबिया (Colombia)
- रशिया (Russia)
- व्हिएतनाम (Vietnam)
बिटकॉइन काम कसे करतो?
बिटकॉइन एक्सपर्ट सांगतात की बिटकॉइन ही एक आभासी चलन (व्हर्च्युअल करन्स) आहे. ज्याची कृत्रीम नाणी असतात. जी मूल्य सांगण्या आणि वाढविण्यासाठी डिजिटल रुपात बनविण्यात आली आहेत. बिटकॉइनच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरज नाही. जर आपल्याकडे बिटकॉइन असेल तर त्याचे किंमत, मूल्य हे ईटीएफ (ETF) व्यवहारात जशी सोन्याची किंमत होते तसेच केले जाते. आपण बिटकॉइनच्या माध्यमातून ऑनलाइन शॉपिंग करु शकतात आणि गुंतवणूकही करु शकता. अर्थातच स्वत:च्या जबाबदारीवर. बिटकॉइन हा एका पर्सनल ई-वॉले मधून दुसऱ्या पर्सनल ई-वॉलेट मध्ये हस्तांतरीत (ट्रन्स्फर) केले जातात. आपण बिटकॉइन लॅपटॉप, डिजिटल सेवा, इंटरनेट, स्मार्टफोन, टॅबलेट अथवा कोणत्याही ई-क्लाउडवर स्टोर करु शकता. त्यावरुन व्यवहार करु शकता. (हेही वाचा, Cryptocurrency: कंपनीच्या CEO चे निधन, पासवर्ड माहित नसल्याने गुंतवणूकदारांचे १३०० कोटी Bitcoin अडकले)
कसे वाढते बिटकॉइन मूल्य?
बिटकॉइन करन्सीचे अभ्यासक सांगतात की, यात अनेकांनी चांगलेच पैसे कमावले आहेत. साधारण सात वर्षांमध्ये बिटकॉइनने 10 रुपयांच्या गुंतवणूकदारास 6.2 लाख रुपयांचा परतावा दिला आहे. 2017 मध्ये बिटकॉइनने जानेवारी ते नोव्हंबर या काळात तब्बल 900% रिटन्स दिल्याचा दावा करण्यात आला होता.
बिटकॉइन एक बुडबुडा
दरम्यान, अनेक अभ्यासकांना असे वाटते की, बिटकॉइन हा एक बुडबुडा आहे. कारण, यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास यातून केव्हा बाहेर पडायचे याचा नेमका सल्ला देता येत नाही. तसेच, फुगलेल्या मूल्याच्या आधारावर तो आणखी किती फूगणार हाही एक सवाल आहे. प्रत्यक्ष वास्तव रुपात हे चलन नसल्याने त्याची सत्यताही निटशी कळत नाही. एकूणच काय तर कितीही प्रलोभणं मिळाली तरी, त्यात गुंतवणूक करायची किंवा नाही हे गुंतवणूकदाराने स्वत:च ठरवायचे आहे.