Hassan Rouhani, President, Islamic republic of Iran. (Photo Credits: Wikimedia Commons)

अमेरिका - ईरान (Iran America Conflict) या देशांमध्ये संघर्ष सुरु असतानाच आता इंग्लंड - ईरान (Iran England Conflict) या देशांमधील तणावही वाढला आहे. इंग्लंडच्या तेलवाहू जहाजावर ताबा मिळवण्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे. अत्याधुनिक हत्यारांनी युक्त असलेल्या ईरानच्या तीन नावांनी पार्शीयन खाडी क्षेत्रात (Persian Gulf Area) ईरानचच्या तेलवाहू टँकरवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतू, रॉयल नेव्हीच्या एका युद्धनौकेने ईरानच्या नावांचा मनसुबा उधळून लावला.

सूत्रांच्या माहितीनुसार, ईरानने होर्मुज खाडी (Strait of Hormuz) परिसरातून जाणाऱ्या ब्रिटिश हेरिटेच तेल टँकरचा मार्ग बदलण्यास आणि तेहरान येथील समुद्री प्रदेशात थांबवण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, याआधी ईरानचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी म्हटले होते की, इंग्लंडला आमचा तेल टँकर अडवण्याचे परिणाम भोगावे लागतील. याला पार्श्वभुमी अशी की, 4 जुलै रोजी जिब्राल्टर खाडीजवळ 300 मीटर लांबीचे ग्रेस-1 नावाचा तेल टँकर यूरोपीय यूनियन (EU) च्या प्रतिबंधांचे उल्लंघन करुन कच्चे तेल सीरियात नेत असल्याच्या संशय आणि आरोपाखील पकडण्यात आले होते. तेव्हापासून हा तेल टँकर जिब्राल्टर खाडीत पडून आहे.

ईरानी राष्ट्रपती रुहानी यांनी बुधवारी सरकारी टीव्हीवर प्रसारीत केलेल्या एका संदेशात म्हटले होते की, 'तुम्ही (इंग्लंड) असुरक्षीततेचे साक्षीदार आहात. तुम्हाला याचा परिणाम भोगावा लागेल. आता तुम्ही इतके निराश व्हायल की, तुम्ही या परिसरातून जाताना तुम्हाल रुरक्षेसाठी अधिक कुमक पाठवावी लागेन. कारण तुम्ही घाबरलेले आहात. मुळात तुम्ही अशा गोष्टींचे समर्थनच का करता?' असा सवालही रुहानी यांनी उपस्थित केला होता. (हेही वाचा, अमेरिकेचा भारताला इशारा, 'रशियाकडून संरक्षण एस-400 प्रणाली घ्याल तर CAATSA प्रतिबंध लादू')

तेल टँकर पकडल्यानंतर ईरानच्या परराष्ट्र मंत्रालयाने इंग्लंडचे राजदूत रॉब मैकेयर यांच्याकडे विरोध दर्शवला होता. तसेच, तेल टँकर सोडण्याची मागणी केली होती. तसेच, ईंग्लंडने अमेरिकेच्या सांगण्यावरुनच तेल टँकर पकडल्याचा आरोपही ईरानने केला होता. दरम्यान, या घटनेनंतर ईरानकडून पार्शियन खाडी ( Persian Gulf Area) परिसरात इंग्लंडच्या तेल टँकवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला.