File image of S-400 long range surface to air missile defence system | (Photo Credits: PTI)

भारत-रशिया एस-400 प्रणाली करार (India Russia S 400 System Defence Deal) पाहून अमेरिकेला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. इतक्या की, 'रशियाकडून संरक्षण एस-400 प्रणाली (S 400 System) घ्याल तर सीएएटीएसए (CAATSA) प्रतिबंध लादू' असा इशाराही अमेरिकेने भारताला दिला आहे. यासंदर्भात बोलताना अमेरिका परराष्ट्र मंत्री मायकल पांपियो यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने या आधीच स्पष्ट केले आहे की, भारताने रशियाकडून एस-400 प्रणाली खरेदी करु नये. तरीही भारताने जर असे केलेच तर अमेरिका भारतावर सीएएटीएसए (Countering America's Adversaries Through Sanctions Act) प्रतिबंध लावू शकतो.

दरम्यान, अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका परिषदेदरम्यान म्हटले आहे की, 'एस-400 प्रणाली' संबंधात अमेरिका भारतासह आपल्या इतरही सहकारी देशांना अवाहन करतो की, रशियासोबत असा कोणताही व्यवहार करु नका. अन्यथा हा व्यवहार करणाऱ्या देशांवर सीएएटीएसए (अमेरिकेचा सल्ला न माणणाऱ्या देशांवर) प्रतिबंध लावण्यात येतील. अमेरिका आणि तुर्कस्तान यांच्यात रशियाकडून एस-400 प्रणाली खरेदी करण्यावरुन आगोदरच मतभेद झाल्याचे पाहायला मिळत आहेत.  (हेही वाचा, एक राऊंड 36 वार: भारत-रशिया S-400 खरेदी करार: काय आहेत वैशिष्ट्ये?)

दरम्यान, भारताने एस-400 प्रणाली खरेदी करण्यासाठी रशियासोबत तब्बल 5343 अब्ज डॉलर्स चा करार गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर रोजीच नवी दिल्ली येथे केला आहे. विशेष म्हणजे भारताने हा करार अमेरिकेने टाकलेला दबाव झुगारुन केला आहे.  (हेही वाचा, भारत, रशियामध्ये S-400डील; अमेरिकेला चिंता, कारण..)

अमेरिकेने हा महिना सुरु होण्यापूर्वीही भारताला रशियाकडून एस-400 प्रणाली खरेदी न करण्याबाबत इशारा दिला होता. त्यावेळी अमेरिकेने म्हटले होते की, भारताने रशियाकडून अशा प्रकारची संरक्षण प्रणाली खेरेदी केल्यास त्याचा परिणाम भारत अमेरिका शस्त्रास्त्र व्यवहारांवरही होऊ शकतो.