भारत, रशियामध्ये S-400डील; अमेरिकेला चिंता, कारण..
प्रतिकात्मक चित्र (Photo: tvc.ru)

कोट्यवधी डॉलर खर्च करुन भारत रशियाकडून S-400 ट्रायम्फ मिसाईल एअर डिफेन्स सिस्टम खरेदी करण्याचा विचार करत आहे. डील जवळपास अंतिम टप्प्यात आहे. या व्यवहारावर अमेरिकेचे बारीक लक्ष असून, ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारी सांगितले की, भारताच्या रशियासोबत होणाऱ्या या व्यवहाराकडे अमेरिका एक महत्त्वाचा व्यवहार म्हणून पाहिल. इतकेच नव्हे तर, या व्यवहारावर अमेरिका प्रतिंबंधही घालू शकते. भारतासाठी अमेरिकेचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत-रशिया यांच्यात होणाऱ्या या व्यवहारावरुन अमेरिका इतकी का चिंतीत आहे, हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय आहे.

अमेरिकाचा भारतावर दबाव?

संरक्षण तज्ज्ञांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेला वाटते की, भारताने रशियाकडून ही शस्त्रसामग्री खरेदी करु नये. जाणकार सांगतात की, S-400चा वापर अमेरिकी फायटर जेट्सची स्टील्थ (गुप्त) बलस्थानं शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच, या सिस्टमचा वापर केल्यास भारताला अमेरिकेच्या जेट्सचा डेटा मिळू शकतो. हा डेटा शत्रूराष्ट्रांच्या किंवा जगाच्या शत्रूच्या हाती लागू शकतो अशीही भीत अमेरिकेला सतावते आहे.

अमेरिकेच्या नाराजीचे कारण

संरक्षण तज्ज्ञांचे म्हणने असे की, S-400 सिस्टमचा वापर केवळ अमेरिकेच्या F-35sशी संबंधीत रडारची ओळख पटविण्यासाठी केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर, F-35sचे कॉन्फिगरेशनचा अचूक वेध घेण्यासाठीही ही सिस्टम वापरली जाऊ शकते. सांगितले जात आहे की, F-35 लायटींग २ सारख्या अमेरिकी एअरक्राफ्टमध्ये स्टील्थसोबत सर्व फीचर्सही नाहीत. S-400 सिस्टमनुसार काही विमाने अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहेत की, समोरुन रडारने जरी ट्र्रॅक केले तरी, त्याचा वेध घेता येत नाही. S-400 सिस्टमचे रडार F-35चा सहज वेध घेऊ शकता. त्यामुळे अमेरिका भारत-रशिया यांच्यातील व्यवहारामुळे चिंतेत आहे. तो भारतावर दबाव टाकू पाहतोय. पण, भारताने अशा प्रकारचा दबाव न घेता हा व्यवहार पूर्ण करावा, असे मत संरक्षणतज्ज्ञ व्यक्त करतात.