Kristalina Georgieva (Photo Credit: X)

कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence) वर्तमानकाळातील अनेक नोकऱ्यांसाठी असुक्षीतता ठरते. मात्र, नव्या उद्योग आणि संकल्पनांसाठी ती मोठी संधी असेल, असे उद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा (Kristalina Georgieva) यांनी म्हटले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आगामी काळात आर्थिक क्षेत्रातील 60 % नोकऱ्यांवर आंतराष्ट्रीय पातळीवर गदा आणेल, असेही म्हणाल्या. स्वित्झर्लंड येथील दाव्होस येथे भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत (World Economic Conference Davos) सहभागी होण्यापूर्वी त्या बोलत होत्या.

विकसनशील देशांवर एआयचा किती प्रभाव?

क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी म्हटले की, विकसनशील देशांवर Artificial Intelligence चा म्हणावा तेवढा परिणाम होणार नाही. त्यामुळे जागतिक पातळीवर बोलायचे तर 40% नोकऱ्यांवर एआय गदा आणू शकते, असे आयएमएफच्या अहवालात पुढे आल्याचे त्यांनी म्हटल आहे. महत्त्वाचेअसे की, तुमच्याकडे कौशल्यावर आधारीत जितक्या अधिक नोकऱ्या असतील त्यावर तेवढाच अधिक परिणाम होईल, याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष वेधले. कृत्रिम बुद्धीमत्ता एकतर तुमची नोकरी पूर्णपणे निष्रभ करेन किंवा त्यामध्ये अधिक सुबकता येईल. ज्यामुळे तुमची उत्पादकता वाढेल तुम्ही अधिक उत्पादनक्षम व्हाल, असेही त्या म्हणाल्या. (हेही वाचा, AI Talent in Demand: मार्केटमध्ये वाढत आहे ChatGPT-4 वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी; आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये प्रतिभावान लोकांच्या शोधात असलेल्या कंपन्यांमध्ये Microsoft, Citigroup चा समावेश)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीद्वारे अहवाल प्रसिद्ध

दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक अहवाल रविवारी सायंकाळी प्रसिद्ध केला. या अहवालात म्हटले आहे की, एआयमुळे प्रभावीत झालेल्या एकूण नोकऱ्यांपैकी केवळ निम्म्या नोकऱ्यांवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. इतरांना एआयमुळे वाढलेल्या नफ्याचा फायदा मिळू शकेल. खास करुन उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमधील श्रमिक बाजारांना सुरुवातीच्या काही काळात एआयमुळे कमी परिणाम दिसून येईल. मात्र, उत्पादकतेचे केंद्रीकरण झाल्याने निर्माण होणाऱ्या वर्धिक उत्पादकतेच्या फायद्यातही घट होण्याची शक्यता वाढू शकते. (हेही वाचा, India Building AI? परिवर्तनीय वापरासाठी AI चा लाभ घेणे हे भारताचे उद्दीष्ट- राजीव चंद्रशेखर)

एआय वापरासाठी अविकसित देशांना मदत हवी

जॉर्जिव्हा यांनी एएफपीला सांगितले की, जगभरामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. खास करुन विकसीत आणि विकसनशील देशही ती मोठ्या प्रमाणात वापरू लागले आहेत. भविष्यातही त्यात चांगली वाढ होईल. मात्र, अविकसित देशांना ती तेवढ्या ताकदीन वापरता येणार नाही. त्यांच्याकडे असलेला तंत्रज्ञानाचा आभाव हा त्यातला मोठा घटक ठरेल. त्यामुळे अविकसीत देशांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संधी पकडण्यासाठी आणि जलदगतीने सक्षम होण्यासाठी मदत करण्यावर इतर देशांनी लक्ष केंद्रीत करायला पाहिजे, असेही जॉर्जिया म्हणाल्या. कृत्रिम बुद्धिमत्ता, होय, थोडी धडकी भरवणारी. पण प्रत्येकासाठी ही एक जबरदस्त संधी आहे, असल्याचा पुनरुच्चाहरी त्यांनी केला. जगभरातील देशांमध्ये वाढू लागलेल्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराच्या पार्श्वभूमीवर क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी व्यक्त केलेली मते अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत.