AI Talent in Demand: मार्केटमध्ये वाढत आहे ChatGPT-4 वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी; आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये प्रतिभावान लोकांच्या शोधात असलेल्या कंपन्यांमध्ये Microsoft, Citigroup चा समावेश
AI Jobs GPT-4 (Photo Credit: Pexels)

चॅटजीपीटीच्या (ChatGPT) करामतीमुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले होते, इतक्यात ओपनएआयने आपला नवीन चॅटबॉट जीपीटी-4 (GPT-4) सादर केला. ज्या गोष्टी चॅटजीपीटी करू शकत नाही अशा अनेक गोष्टी जीपीटी-4 करत आहे. म्हणूनच सध्या अनेक कंपन्यांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याचे दिसून येत आहे. आजकाल जवळजवळ सर्व क्षेत्रातील कंपन्या जीपीटी-4 संदर्भात नोकऱ्या पोस्ट करत आहेत. अशा कंपन्यांना एआयमध्ये प्रतिभावान कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. चॅटजीपीटी-4 मध्ये निपुण असलेल्या लोकांच्या शोधात असलेल्या काही उल्लेखनीय कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट, सिटीग्रुप, मर्क अँड कंपनी, थॉमसन रॉयटर्स कॉर्प आणि द ट्रॅव्हलर्स यांचा समावेश होतो. शुक्रवारी एका अहवालात ही बाब समोर आली.

सध्या लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) हे झपाट्याने वाढणारे क्षेत्र आहे आणि डीप लर्निंग, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) आणि संबंधित तंत्रज्ञानामध्ये कौशल्य असलेल्या कुशल व्यावसायिकांची मागणी वाढत आहे. एक आघाडीची डेटा आणि विश्लेषण कंपनी ग्लोबलडेटा (GlobalData) नुसार, जसजसे कंपन्या कस्टमर सर्व्हिस आणि ऑपरेशनल इफीशियन्सी सुधारण्यासाठी चॅटबॉट्स आणि इतर लार्ज लँग्वेज मॉडेल एआय (LLM AI) तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत, तसतसे या प्रणाली विकसित करण्यासाठी, त्यांची देखरेख करण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी प्रतिभावान व्यक्तींची गरज देखील वाढत आहे. म्हणूनच विविध क्षेत्रातील कंपन्या जीपीटी-4 शी संबंधित नोकर्‍या पोस्ट करत आहेत.

ग्लोबलडेटा येथील बिझनेस फंडामेंटल्स अॅनालिस्ट शेर्ला श्रीप्रदा म्हणतात, 'जीपीटी-4 लाँच झाल्यापासून त्याचा ऑनलाइन बझ वाढत आहे. नुकतेच ओपनआयने जीपीटी-4 टर्बो (GPT-4 Turbo) लाँच केले. जीपीटी-4 आणि चॅटजीपीटी सारख्या जनरेटिव्ह लँग्वेजचा वापर करून लँग्वेज आणि मल्टी-मॉडल मॉडेल्सची पुढील पिढी सादर करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ओपनएआय सोबत भागीदारी करत आहे.’ (हेही वाचा: कामाच्या ठिकाणच्या खराब तंत्रज्ञान सुविधांमुळे 40% भारतीय कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत- Reports)

मायक्रोसॉफ्टने 'स्काईप सिनीअर सॉफ्टवेअर इंजिनियर' या रोलसाठी जॉब पोस्ट केला आहे, ज्यामध्ये मुख्यत्वे जीपीटी-4 मध्ये काम करणे समाविष्ट आहे. सिटीग्रुपमध्येही ‘जनरेटिव्ह एआय फुल स्टॅक इंजिनीअरिंग लीड- कोडिफाइड कंट्रोल्स’ची पोस्ट आहे ज्यामध्येही जीपीटी-4 मध्ये काम करणे गरजेचे आहे. असेच मर्क अँड कंपनीमध्ये AI/ML Engineer पदासाठी लोकांची गरज आहे, तर द ट्रॅव्हलर्स कंपनीमध्ये 'सिनीअर डेटा इंजिनीअर (Generative AI, Cloud, AWS, Python, Snowflake)' पदावर लोक भरले जात आहेत.