Jobs | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतीय कर्मचाऱ्यांच्याबद्दल एक अहवाल समोर आला असून, ज्यामध्ये म्हटले आहे की जवळजवळ 40 टक्के भारतीय कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या अपुऱ्या तंत्रज्ञान साधनांमुळे नाखूष आहेत. अहवालात नमूद केले आहे की, देशातील अंदाजे 40% कर्मचारी अपुऱ्या तंत्रज्ञान साधनांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यामुळे पुढील सहा महिन्यांत आपली नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत. सॉफ्टवेअर प्रमुख Adobe नुसार, दोन्ही लीडर्स (93%) आणि कर्मचारी (87%) असे दोघेही सहमत आहेत की, कमी गुणवत्तेची तंत्रज्ञान साधने उत्पादकतेत अडथळा आणू शकतात. भारतीय कामगारांनी यावर भर दिला की, कामाच्या ठिकाणची तांत्रिक सुलभता ही ती नोकरीची ऑफर स्वीकारण्याच्या त्यांच्या निर्णयावर लक्षणीय प्रभाव टाकते. तब्बल 34 टक्के लोकांनी ही बाब महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले तर, ही बाब सर्वोच्च प्राधान्य असल्याचे 50 टक्के लोक मानतात.