Nazis Camp: 98 वर्षीय व्यक्तीवर नाझी छावणीत नागरिकांचा छळ केल्याचा आरोप, जर्मनीच्या सरकारी वकीलांची माहिती
Adolf Hitler | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जर्मनीतील एका 98 वर्षीय नागरिकावर ठेवण्यात आलेल्या आरोपांमुळे जर्मनीचा हुकुमशाहा ॲडॉल्फ हिटलर त्याचा नाझी पक्ष आणि त्यांनी उभारलेल्या छळ छावण्या ( Nazis’ Sachsenhausen Concentration) पुन्हा एकदा चर्तेत आल्या आहेत. नाझींच्या छावण्यांमध्ये हा व्यक्ती सुरक्षारक्षक म्हणून भूमिका बजावत होता. सन 1943 ते 1945 या काळात त्याने असंख्य नागरिकांच्या हत्येसाठी मदत केली, असा त्याच्यावर आरोप आहे. गिसेनमधील सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, फ्रँकफर्टजवळील मेन-किन्झिग काउंटीमधील रहिवासी असलेल्या जर्मन नागरिकावर एसएस गार्ड डिटेलचा सदस्य म्हणून हजारो कैद्यांच्या क्रूर आणि दुर्भावनापूर्ण हत्येचे समर्थन केल्याचा आरोप आहे. सध्या तो संशयीत आहे. त्यामुळे त्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही.

दरम्यान, त्याच्यावर आरोप आहे की, त्याने सन 1943 ते 1945 या काळात जवळपास 3,300 हून अधिक हत्या केल्या आहेत. या नागरिकांना त्याने अत्यंत क्रूरपणे ठार मारले. त्याच्यावर हानाऊ येथील राज्य न्यायालयात अभियोग दाखल करण्यात आला होता. मात्र, त्याने हे कृत्य करतानाचे त्याचे वय पाहता त्याच्यावर बाल न्यायालयात खटला दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

कोण होता हिटलर?

ॲडॉल्फ हिटलर (1889-1945) हा एक जर्मन राजकीय नेता होता. जो जर्मनीचा चांसलर म्हणून सत्तेवर आला आणि पुढे तो हुकुमशाहा बनला.सन 1934 ते 1945 पर्यंत नाझी जर्मनीचा हुकूमशहा किंवा फ्युहरर बनला. त्याच्या सत्तेच्या काळात त्याचे नेतृत्व आणि धोरणे अतिशय क्रूर होती. ज्याचा जगावर मोठा परिणाम झाला. अवघ्या विश्वालाच दुसऱ्या महायुद्धाला सामोरे जावे लागले. ॲडॉल्फ हिटलर आणि नाझी राजवटीचा त्यांच्या कृती आणि विचारसरणीसाठी सार्वत्रिक निषेध केला जातो. नाझींमुळे दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रचंड मानवी दुःख आणि जीवितहानी झाली. इतिहासातील या अंधकारमय कालखंडातील धडे फॅसिझम, कट्टर राष्ट्रवाद आणि पूर्वग्रह म्हणून ओळखले जातात.

राजकीय विरोध दडपून, माध्यमांवर कडक नियंत्रण लादून आणि अल्पसंख्याक गटांना, विशेषत: ज्यूंना लक्ष्य करून हिटलरने जर्मनीचे त्वरीत निरंकुश राज्यामध्ये रूपांतर केले. नाझी राजवटीने न्युरेमबर्ग कायदे आणि ज्यूंचा छळ यांसारख्या धोरणांची अंमलबजावणी केली, ज्यामुळे शेवटी होलोकॉस्ट झाला, परिणामी लाखो ज्यू आणि इतर अल्पसंख्याकांचा पद्धतशीर नरसंहार झाला.