Adolf Hitler and the watch that was sold in the auction. Credits: Wikimedia commons and Twitter/ IANS

इतिहास जतन करणे सोपे नाही. त्यात इतिहासामधील गोष्टी जतन करणे तर खूपच अवघड आणि महाग आहे. आता हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरचे एक घड्याळ (Adolf Hitler's Watch) मेरीलँडमधील अलेक्झांडर हिस्टोरिकल ऑक्शनमध्ये $1.1 दशलक्ष (अंदाजे 8.7 कोटी) मध्ये विकले गेले. गेले अनेक दिवस या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागून होते मात्र आता त्याची चौकशी करण्यात येत आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ज्यू समुदायाच्या सदस्यांच्या भीतीनंतरही अमेरिकेत घड्याळाची विक्री करण्यात आली. हे घड्याळ जर्मन वॉच फर्म ह्युबरने बनवले आहे, ज्यावर स्वस्तिक आहे आणि त्यावर AH हे अक्षर कोरलेले आहे.

हिटलरच्या या घड्याळाची बोली लावल्याबद्दल ज्यू समुदाय आधीच संतप्त असून त्यांनी या लिलावावर आक्षेपही घेतला होता. मात्र, असे असतानाही अमेरिकेतील मेरीलँड येथील अलेक्झांडर हिस्टोरिकल ऑक्शनमध्ये हे घड्याळ अशा व्यक्तीला विकले गेले ज्याला कोणी ओळखत नाही. म्हणजेच बोली लावणारा निनावी आहे, त्याने त्याची ओळख सार्वजनिक होऊ दिली नाही.

ऐतिहासिक ऑटोग्राफ, दस्तऐवज आणि छायाचित्रे, लष्करी आणि संघर्षांमधील महत्त्वाचे अवशेष जतन असलेल्या या लिलावगृहाचे म्हणणे आहे की, हिटलरला हे घड्याळ 20 एप्रिल 1933 रोजी त्याच्या 44 व्या वाढदिवसाला देण्यात आले होते, जेव्हा तो जर्मनीचा चांसलर झाला होता. लिलावकर्त्यांनी असे म्हटले आहे की, जगातील सर्वात अनुभवी आणि प्रतिष्ठित घड्याळ तज्ञ आणि लष्करी इतिहासकारांनी सखोल संशोधनानंतर हे निश्चित केले आहे की हे घड्याळ खरोखरच अॅडॉल्फ हिटलरचे आहे. (हेही वाचा: कोलंबियाच्या दोन शेतकऱ्यांनी पिकवला 4.25 किलोग्रॅम वजनाचा भलामोठा आंबा, जगातील सर्वात वजनदार आंबा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, पाहा फोटो)

हे घड्याळ फ्रेंच गटाच्या लष्करी गटाने युद्ध स्मृतिचिन्ह म्हणून घेतले होते, जेव्हा 4 मे 1945 रोजी या गटाने हिटलरच्या बर्गोफ पर्वतावरील किल्ल्यासारख्या इमारतीवर हल्ला केला होता. येथून युद्ध जिंकल्यानंतर फ्रेंच सैनिक जेव्हा आपल्या घरी परत येऊ लागले तेव्हा त्या गटातील एक सैनिक सार्जंट रॉबर्ट मिग्नॉटने हे घड्याळ आपल्यासोबत फ्रान्सला आणले. त्यानंतर त्याने हे घड्याळ त्याच्या चुलत भावाला विकले आणि तेव्हापासून ते घड्याळ मिग्नोटा कुटुंबाकडेच होते.