Narendra Modi At Eastern Economic Forum (Photo Credits : ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी आज, 5 सप्टेंबर रोजी रशिया (Russia)  येथील व्लादिवस्तोक (Vladivostok)  शहरात आयोजित करण्यात आलेल्या ईस्टर्न इकॉनमिक फोरम (Eastern Economic Forum)  मध्ये उपस्थितांशी संवाद साधला. पूर्वेकडील देशांच्या आर्थिक विकासाच्या उपाययोजना ठरवण्याकरिता मागील पाच वर्षांपासून या फोरमचे जागतिक स्तरावर आयोजन करण्यात येते. भारताचे पूर्वेकडील देशांशी असलेले जुने संबंध अधोरेखित करत मोदींनी याठिकाणी आज एक मोठी घोषणा सुद्धा केली. भारतीय सरकारने नेहमीच 'Act East योजनेच्या अंतर्गत रशियाच्या पूर्व आशिया खंडातील भागांना सामावून घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर भारताकडून संबंधित देशांना 1 बिलियन अमेरिकी डॉलरची मदत कर्जस्वरूपात देणार असल्याचे आज मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. यामुळे आपल्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असेही ते म्हणाले.

ANI ट्विट

आज, नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून सोव्हियेत रशिया व भारताच्या संबंधांविषयी देखील भाष्य केले. पूर्वेकडील देशांच्या विकासाकरिता भारत नेहमीच रशियाशी खांद्याला खांदा लावून काम करत आहे, तसेच रशियाने देखील भारताला नेहमीच पाठिंबा दिला आहे. व्लादिवस्तोक मध्ये दूतावास उघडणाऱ्या देशांमध्ये भारत हा पहिला देश आहे हे याचेच एक उदाहरण असल्याचे मोदी म्हणाले. तसेच जेव्हा सोव्हियेत रशिया मध्ये परदेशी लोकांना प्रवेश नाकारण्यात आला होता तेव्हा सुद्धा व्लादिवस्तोक मध्ये भारतीयांवर  बंधने ठेवण्यात आली नव्हती. (भारताकडून दाऊद इब्राहीम याच्यासह पाकिस्तानलाही दणका; अमेरिकेने दिला पाठिंबा, केले कौतुक)

दरम्यान, आपल्या भाषणात मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. आपण 'सबका साथ सबका विकास'  या धोरणावर आधारित नवीन भारताचा पाया रचू  इच्छितो असे म्हणता त्यांनी 2024 पर्यंत भारताला 5  ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणार असल्याचे ध्येय बोलून दाखवले. मात्र सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता तसेच मोदींविषयी रोज समोर येणारी आकडे लक्षात घेतल्यास मोदींची प्रतिक्रिया काहीशी विरोधाभासी ठरते.