Dawood Ibrahim, Hafiz Saeed, Masood Azhar | (Photo Credits: PTI/IANS)

दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim), मसूद अजहर (Masood Azhar), हाफिज सईद (Hafiz Saeed आणि झाकी उर रहमान लखवी (Zaki-ur-Rehman Lakhvi) यांना भारताने दहशतवादी म्हणून घोषीत केले आहे. दहशतवाद विरोधी कायदा (UAPA) वापरत भारती गृहमंत्रालयाने (Home Ministry India) हा निर्णय घेतला. भारताच्या निर्णयाचे अमेरिकेनेही जोरदार स्वागत केले आहे. भारताच्या निर्णयाचे स्वागत करताना अमेरिका परराष्ट्र मंत्रालय दक्षिण मध्य अशियाई ब्युरोतील कार्यकारी उपमंत्री एलिस वेल्स यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'दहशतवाद विरोधात आम्ही भारतासोबत आहोत. त्यामुळे दाऊद, अजहर, सईद आणि लखवी यांना दहशतवादी म्हणून घोषीत केल्याबद्दल आम्ही भारताचे स्वागत करतो. भारताच्या या निर्णयामुळे दहशतवाद विरोधातील लढाईतील भारत अमेरिका संयुक्त प्रयत्नांसाठी एक नवा पर्याय मिळाला आहे.'

भारतीय संसदेने बेकायदेशीर कृती कायदा 1967 (UAPA Act) विचारात घेतल्यावर सुमारे एक महिन्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने ही घोषणा बुधवारी केली. गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार 'केंद्र सरकारने म्हटले आहे की, दहशतवादी कृत्यात सहभागी झालेबद्दल दाऊद इब्राहीम, मसूद अजहर, हाफिज सईद आणि जाकी उर रहमान लखवी यांना दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. (हेही वाचा, नवीन UAPA कायद्यांतर्गत दहशतवाद्यांची यादी जाहीर; मसूद अझर, हाफिज सईद, दाऊद इब्राहिम आणि लखवी यांचा समावेश)

ट्विट

हाफिज मोहम्मद सईद सन 2008 मध्ये मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. तर, मसूद अजहर हा सन 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणि पुलवामा येथे CRPF जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासाठी जबाबदार आहे. तर काही वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत दाऊद इब्राहीम मुख्य सूत्रधार आहे.