शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3) मधील कलम 10 अ पोटकलम (4) मधील अधिकारांचा वापर करत राज्य निवडणूक आयोगानं 271 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत.