मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या हद्दीत अनेक गुन्हेगारी घटना घडतात. या गुन्हेगारी घटनांवर नजर ठेवण्यासाठी आणि रूळ ओलांडणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी मध्य रेल्वे आता ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करणार आहे.