
मध्य रेल्वेकडून कल्याण (Kalyan) आणि बदलापूर (Badlapur) स्थानकादरम्यान पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. 29 आणि 30 मार्च 2025 दिवशी हा विशेष पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. पुलाच्या बांधकामासाठी या ब्लॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच दोन्ही स्टेशन वर या ब्लॉकदरम्यान ब्रीजच्या गर्डर्सचं डी लॉंचिंग केले जाणार आहे. त्यामुळे येत्या शनिवार, रविवारी अप आणि डाऊन मार्गावर वाहतूक कमी करण्यात आली आहे. ब्लॉकच्या काळात काही विषेष वाहतूक सेवा पुरवली जाणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक दिनांक 30 मार्चला (शनिवार/रविवारच्या मध्यरात्री) 1.30 वाजता सुरू होईल. हे काम 30 मार्चच्या (रविवार पहाटे) रोजी 4.30 वाजेपर्यंत अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान सुरू असेल. या कामादरम्यान काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. तर ब्लॉकच्या काळात अंबरनाथ आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा चालवल्या जाणार नाहीत.
कर्जत -पनवेल -दिवा मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस,
विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,
हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेनसागर एक्सप्रेस, होसपेट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
दरम्यान कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांसाठी कल्याणला नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना ठाणे येथे थांबा देण्यात येणार आहे.
मुंबई लोकल मधील बदल
परळ येथून 23.13 ला परळ- अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 23.51 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बदलापूर लोकल अंबरनाथ संपेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.12 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत लोकल अंबरनाथ येथे संपेल.
कर्जत येथून 2.30 वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून चालवली जाईल आणि अंबरनाथ येथून 3.10 वाजता सुटेल.
कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल कर्जत येथून 4.10 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 6.08 वाजता पोहोचेल.