Rubina Akib Inamadar | X @ CR

मध्य रेल्वेच्या महिला तिकीट तपासनिक असलेल्या Rubina Akib Inamdar यांनी एका दिवसात विना तिकीट प्रवास करणार्‍यांकडून दंड गोळा करत 45 हजारांपैक्षा अधिक वसुली केली आहे. रूबिना यांनी सुमारे 150 जणांकडून दंड गोळा केला. सध्या गर्दीच्या वेळी अनेकजण विना तिकीट प्रवास करतात. प्रामुख्याने एसी लोकल आणि फर्स्ट क्लास मध्ये सर्रास प्रवासी चढतात. त्यामुळे तिकीट काढणार्‍या अनेकांची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तिकीट तपासणार्‍यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

सोमवारी रूबिनाने एका दिवसात विना तिकीट प्रवास करून 45,705 रूपये दंड वसूली करून दिली आहे. सोशल मीडीयात X वर मध्य रेल्वे च्या अकाऊंट वरून तिच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आलं आहे. ही कमाई रेकॉर्डब्रेकिंग असल्याचं म्हटलं आहे. Rubina Akib Inamadar ही Tejaswini 2 Batch, Mumbai Division ची टीटीई असल्याचं म्हटलं आहे. तिने 150 हून अधिक प्रवाशांकडून 45,705 रूपये कमावले. यामध्ये फर्स्ट क्लास मधील 57 विना तिकीट प्रवासी होते ज्यांच्याकडून 16,430 रूपये दंड वसुली केली.

Rubina Akib Inamadar  चं कौतुक करणारी मध्य रेल्वेची पोस्ट

मुंबई विभागातील सर्व प्रवाशांना त्रासमुक्त आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी मध्य रेल्वे सर्व पावले उचलत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणीचा समावेश आहे जेणेकरून लोकांना तिकीटाशिवाय प्रवास करता येणार नाही.हे मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल आणि एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन आणि हॉलिडे स्पेशल ट्रेनमध्ये केले जात आहे.