Moon | (Photo Credit: ISROI/Twitter)

भारतीय अंतराळ संशोधन परिषद– इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-2 (Chandrayaan-2) मोहिमेच्या ऑर्बिटरच्या मदतीने चंद्राविषयी सतत नवीन माहिती समोर येत आहे. आता चंद्रावर हायड्रॉक्सिल आणि पाण्याचे रेणू सापडले आहेत. चंद्रयान-2 ही मोहीम 2019 मध्ये चंद्राची दूरची बाजू शोधण्यासाठी लॉन्च करण्यात आली होती. मात्र चांद्रयान-2 मोहिमेच्या रोव्हरचा चंद्रावरच अंत झाला. मिशनचा रोव्हर पृष्ठभागावर क्रॅश झाल्यावर तो संपला. लँडर आणि रोव्हर अपघातातून वाचले नाहीत. ऑर्बिटर अजूनही चंद्रावर घिरट्या घालत आहे व नवनवीन शोध लावत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या दुसऱ्या मोहिमेचा उत्तराधिकारी चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्यासाठी इस्रो सज्ज आहे.

तर, भारताचे दुसरे चंद्र मिशन 'चंद्रयान-2' ने चंद्रावर पाण्याच्या रेणूंची उपस्थिती शोधली आहे. मिशन दरम्यान मिळालेल्या आकडेवारीवरून हे उघड झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे माजी अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांच्या सहकार्याने लिहिलेल्या एका शोधनिबंधात म्हटले आहे की, 'चांद्रयान-2' मधील उपकरणांमध्ये 'इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर' (IIRS) नावाचे एक इन्स्ट्रुमेंट आहे, जे जागतिक वैज्ञानिक डेटा मिळवण्यासाठी 100 किमीच्या ध्रुवीय कक्षावर काम करत आहे.

'करंट सायन्स' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या पेपरमध्ये म्हटले आहे की, 'आयआयआरएसकडून मिळालेला प्रारंभिक डेटामधून समोर येत आहे की, चंद्रावर  29 ° N आणि 62 ° N अक्षांश दरम्यान व्यापक हायड्रॉक्सिल (OH) आणि पाणी (H2O) रेणूंची उपस्थिती स्पष्टपणे दिसत आहे.

डेहराडूनच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंगच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, अवकाशातील हवामानामुळे चंद्रावर हायड्रॉक्सिल आणि पाणी असू शकते. जेव्हा सौर वारे चंद्राच्या पृष्ठभागावर आदळतात तेव्हा अवकाश हवामान प्रक्रिया घडते. यासह, इतर काही घटकांमुळे रासायनिक बदल होतात, जे हायड्रॉक्सिल तयार होण्याचे कारण असू शकतात. (हेही वाचा: ISRO GSLV F-10: इस्रोला GSLV F-10 उपग्रह प्रक्षेपित करण्यात अपयश, तिसऱ्या टप्प्यात गेल्यावर आला तांत्रिक अडथळा)

दरम्यान, भारताने 22 जुलै 2019 रोजी चंद्रावर आपले दुसरे चंद्रयान ‘चांद्रयान-2’ पाठवले होते. मात्र, त्यामधील लँडर 'विक्रम' त्याच वर्षी 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात 'सॉफ्ट लँडिंग' करण्यात यशस्वी ठरला नाही, ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर उतरणारा देश बनण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.