Oppo Reno 6 Pro 5G स्मार्टफोनच्या सेलला आजपासून सुरुवात; पहा किंमत, ऑफर्स, फिचर्स आणि इतर Details
Oppo Reno6 Pro 5G (Photo Credits: Oppo)

Oppo Reno 6 Pro 5G स्मार्टफोन नुकताच भारतात लॉन्च झाला असून आजपासून (29 जुलै) या फोनचा सेल सुरु झाला आहे. हा फोन Flipkart.com आणि इतर रिटेल्स स्टोअर्समध्ये खऱेदीसाठी उपलब्ध होईल. या सेल अंतर्गत एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि कोटक बँकचे (Kotak Bank) क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा (Credit or Debit Card) वापर ईएमआय ट्रॅन्जॅक्शन (EMI Transaction) निवडल्यास ग्राहकांना 3000 रुपयांपर्यंतचा कॅशबक मिळेल. यासोबतच पेटीएमने पेमेंट केल्यास ग्राहकांना 15 टक्के डिस्काऊंट देखील मिळेल. Bajaj Finserv ने पेमेंट केल्यास 3000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक (Cashback) मिळू शकतो. ही ऑफर फक्त 31 जुलै पर्यंत मर्यादीत आहे.

या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम+128जीबी स्टोरेज हा वेरिएंट उपलब्ध असून याची किंमत 29,990 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले 2400 x 1080p या स्क्रिन रिज्योल्युशन सह देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये MediaTek Dimensity 900 SoC हा दमदार प्रोसेसर देण्यात आला आहे. (Oppo Reno 6 Series: ओप्पोच्या रेनो 6 सिरीज 5जी स्मार्टफोनची जिओसोबत स्टँडअलोन नेटवर्क चाचणी यशस्वी)

तसंच या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून यामध्ये 64MP चा मेन सेन्सर, 8MP चा वाईल्ड एंगल सेन्सर आणि 2MP मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या 32MP चा फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे. या मोबाईलमध्ये 4300mAh ची बॅटरी दिली असून 65W चा फास्ट चार्गिंग सपोर्ट सुद्धा दिला आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 11 वर आधारीत ColorOS 11.3 वर काम करतो.