
OnePlus 7T Pro खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे. कारण अॅमेझॉनवर वन प्लस 7टी प्रोच्या 256 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनवर 6 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. तसेच खरेदी केल्यास युजर्सला 3 हजार रुपयांचा कॅशबॅक ही मिळणार आहे. या दोन्ही ऑफर एकत्रित केल्यास फोनची किंमत 44,999 रुपये होणार आहे. हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून सुद्धा खरेदी करता येणार आहे. यामध्ये जुना स्मार्टफोनच्या बदल्यात 13 हजार रुपयापर्यंतचा फायदा होणार आहे. तसेच अॅमेझॉनवर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन शॉपिंग करणाऱ्या युजर्सला 5 टक्के अतिरिक्त सुट ही दिली जाणार आहे.
या स्मार्टफोनसाठी 1440X3120 पिक्सल रेज्यॉल्यूशसह 6.6 इंचाचा QHD+डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेची खासियत अशी आहे की, हा 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येणार आहे. याचा अॅस्पेक्ट रेशिओ 19.5:9 असा आहे. ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स लेस असून यामध्ये युजर्सला फिंगरप्रिंट सेंसर ही दिला जाणार आहे. (Realme X2 चा नवा वेरियंट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरासह 8 मेगापिक्सल टेलिफोटो लेस आणि एक 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये युजर्सला 16 मेगापिक्सल पॉप-अप कॅमेरा दिला आहे. 8 जीबी रॅम आणि UFC 3.0 चा 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह येणाऱ्या या फोनसाठी स्नॅपड्रॅहन 855+ प्रोसेसर दिला आहे. ओएसबाबत बोलायचे झाल्यास फोन अॅन्ड्रॉइड 10 वर आधारित असून Oxygen OS वर काम करणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4,085mAh ची बॅटरी दिली आहे जी 30 वॅटच्या फास्ट चार्जिंगसह येणार आहे.