![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/09/BeFunky-Collage-784x4411-380x214.jpg)
टेक्नॉलॉजी सतत अपडेट होत असते. त्यामुळेच आता तुमचा स्मार्टफोन कोणत्याही सिमकार्डशिवाय काम करेल. कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे अगदी खरे आहे. हे शक्य झाले आहे टेक्नॉलॉजीतील नव्या क्रांतीमुळे. यामुळेच आता फिजिकल सिम कार्डशिवाय मोबाईल चालणे, शक्य झाले आहे. हे सर्व शक्य झालं आहे ते ई सिम तंत्रज्ञानामुळे.
काय आहे ई सिम?
ई सिमचा अर्थ इंबेडेड सब्सक्राईबर आइडेंटिटी मॉड्यूल. हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक सिम आहे. जे प्लॉस्टिकच्या फिजिकल सिमला रिप्लेस करेल. ई-सिम तुम्ही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डिव्हाईसमध्ये इंस्टॉल करु शकता. त्यामुळे हे डिव्हाईसमध्ये वेगळे लावण्याची गरज भासणार नाही.
ई सिमचे फायदे
- भारतात याचा प्रयोग सर्वात आधी अॅपल वॉचमध्ये करण्यात आला. त्यानंतर आता हे तंत्रज्ञान मोबाईल फोनमध्ये देखील वापरण्यात येणार आहे. याचा सर्वाधिक फायदा नंबर पोर्ट करताना होईल.
- ई सिमचे कनेक्शन घेण्यासाठी सिम खरेदी करण्याची गरज नाही. कारण हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम करेल. त्यामुळे वारंवार सिम बदलावे लागणार नाही.
- युजर्सला नंबर पोर्ट करण्यासाठी फक्त काही मिनिटं खर्च करावी लागतील. सर्व्हिस प्रॉव्हायडर लगेच तुमच्या नंबरचे ऑपरेटर बदलू शकेल.
- याशिवाय ई सिम तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोनची बॅटरी कमी खर्च होईल. म्हणजेच तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीची लाईफ वाढेल. हे तंत्रज्ञान सॉफ्टवेअरद्वारे काम करणारे असल्याने स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड स्लॉटची गरज पडणार नाही आणि मोबाईल कंपन्यांना फोन फिचर अपग्रेड करण्यासाठी अधिक जागा मिळेल.
ई सिमसाठी
देशात सध्या ई सिम तंत्रज्ञानाचा वापर रिलायन्स जिओ आणि एअरटेल वॉचच्या माध्यमातून केला जात आहे. दूरसंचार विभाग (डॉट) ने सिमच्या वापराला मंजूरी देण्यासाठी नव्या सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांनुसार युजर्सला नव्या कंपनीचे कनेक्शन घ्यायचे असल्यास स्मार्टफोन किंवा डिव्हाईसमध्ये ई-सिम घालता येईल.