Google Map ला कशी कळते Live Traffic ची माहिती, येथे जाणून घ्या
Google Map (Photo Credits-File Image)

गुगल मॅपकडून (Google Map) वेळोवेळी आपल्या लाइव्ह ट्रॅफिक (Live Traffic) बद्दल अधिक माहिती दिली जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का गुगलला स्थानिक ठिकाणच्या लाइव्ह ट्राफिकची माहिती कशी मिळते? खरंच गुगलने सर्व ठिकाणच्या ट्रॅफिकची माहिती मिळवण्यासाठी काही खास डिवाइस लावलेय का? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर ते शक्य नाही आहे. असे असते तर गुगल चहूबाजुंऐवजी  अन्य जागेच्या ट्राफिकची माहिती उपलब्ध करुन देण्यास सक्षम नसते. तुम्ही म्हणाल आता की सॅटेलाइटच्या मदतीने हे काम केले जाते. पण हे सुद्धा शक्य नाही आहे. तर येथे जाणून घ्या गगुल अखेर कशा पद्धतीने लाईव्ह ट्राफिक बद्दल माहिती आपल्याला देते.(Instagram वरील 'या' दमदार फिचर्स बद्दल अधिक जाणून घ्या)

खरंतर गुगलला तुमच्या मोबाईल मधूनच लाइव्ह ट्रॅफिकची माहिती मिळते. कारण गुगल Android आणि iOS युजर्सचे लोकेशन ट्रेस करत असते. त्याच्याच मदतीने गुगलला ट्राफिकची माहिती मिळते. गुगलला ज्या रोडवर अधिक मोबाईल युजर्सची संख्या दिसते तेथेच गुगल ट्रॅफिक जॅम दाखवतो. त्यामुळे युजर्सला ट्राफिक जॅमचे नोटिफिकेशन दिसते.(WhatsApp लवकरच सादर करणार multi-device support हे नवे फिचर; पहा काय आहे खासियत)

दरम्यान, एका युजर्सने खोटे ट्राफिक जॅम करण्यासाठी एक युक्ती सुद्धा केली होती. त्यानुसार त्याने एका लहान ट्रॉलीमध्ये 90 अॅक्टिव्ह मोबाईल ठेवून ट्रॅफिक जॅम केले होते. गुगल मॅप फक्त ट्राफिक जॅमसह अन्य सोर्सच्या माध्यमातून ही ट्राफिकची माहिती मिळवतो.

याआधी गुगल मॅपकडून कोरोना व्हायरसच्या संकट काळात  लोकांना सहज आणि सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी कोविड लेयर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील 220 देशांच्या मॅप्समध्ये कोविड लेअर टाकण्यात आला आहे. या कोविड लेअरमुळे तुम्ही प्रवास करत असलेल्या विभागातील कोरोनाग्रस्तांची माहिती तुम्हाला मॅपवरुन मिळणार आहे.