लोकप्रिय फोटो शेअरिंग अॅप Instagram आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवे फिचर्स लॉन्च केले जातात. त्यामुळे युजर्सला उत्तम अनुभव देऊ शकतात. यंदाच्या वर्षात कंपनीने इन्स्टाग्राम अधिक खास बनवण्यासाठी नवे फिचर्स रोलआउट केले आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का, इन्स्टाग्राममध्ये असे काही फिचर्स आहेत ते त्याला दमदार बनवतात. तर आज आम्ही तुम्हाला इन्स्टाग्रामवरील अशा काही फिचर्स बद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओसह मेसेज पाठवण्यासाठी मजा येईल.
इन्स्टाग्राम हे सध्या तरुणांमध्ये फार लोकप्रिय अॅप असून यावर फोटो, व्हिडिओ किंवा एखादे रिल ही शेअर करता येते. परंतु इन्स्टाग्रामवरील असे ही काही फिचर्स आहेत ते याला अधिक उत्तम बनवण्यास मदत करतात. तर जाणून घ्या त्याबद्दल येथे अधिक.(भारतातील 'या' 4 मोठ्या बँकांसोबत WhatsApp Pay ची पार्टनरशीप; तब्बल 20 लाख युजर्संना घेता येईल डिजिटल पेमेंटचा लाभ)
-मेसेजचा रिप्लाय किंवा फॉरवर्ड करणे
इन्स्टाग्रामवर हे फिचर यंदाच्याच वर्षात अॅड केले आहे. हे फिचर व्हॉट्सअॅप फिचर सारखेच काम करते. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या खास मेसेजचा रिप्लाय करणार असाल तर त्यावर टॅप करुन होल्ड करावे. त्यानंतर तुम्हाला तेथे रिप्लाय लेबल दिसून येणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर रिप्लाय दिला जाऊ शकतो. तसेच त्या मेजेवर टॅप करुन होल्ड केल्यानंतर More ऑप्शनवर क्लिक करा. असे केल्यानंतर मेसेज फॉरवर्ड करता येणार आहे.
- Instagram अकाउंट स्विच करणे
इन्स्टाग्रामवर तुमचे अकाउंट असल्यास तुम्ही सोप्प्या पद्धतीने प्रोफाइल फोटो डबल टॅप करुन स्विच करु शकता. प्रोफाइल तुमच्या इंस्टाफिड मध्ये सर्वात खाली उजव्या बाजूला दिले आहे. दोन पेक्षा अधिक इंन्स्टाग्राम अकाउंट स्विच करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ प्रोफाइलव क्लिक करुन ठेवावे लागणार आहे.(EPOS कंपनीने भारतात लाँच केली ADAPT प्रीमियम हेडफोन्सची सीरिज, वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल हैराण)
-आपोआप गायब होतील फोटो आणि व्हिडिओ
इन्स्टाग्रामवर Disappearing फिचर्स दिले आहे. त्याच्या द्वारे पाठवण्यात आलेले फोटो किंवा व्हिडिओ डिलिट होतात. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्याला Disappearing फोटो किंवा व्हिडिओ पाठवायचा असल्यास त्याच्या इनबॉक्स सेक्शनमद्ये जाऊन युजर्सला पाठवावा. यामध्ये युजर्सला View Once, Allow Once आणि Keep in Chat मधील एखादे ऑप्शन निवडावे लागणार आहे.
त्याचसोबत युजर्सला इन्स्टाग्रावरील स्टोरी म्यूट किंवा अनम्यूट ही करता येणार आहे. त्यासाठी स्टोरी सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला ते करता येणार आहे. अजून एक दमदार फिचर्स म्हणजे इमोजीचा वापर करता येणार आहे. त्यामुळे एखाद्याच्या फोटोला किंवा मेसेजला इमोजीच्या माध्यमातून ही रिप्लाय करु शकता.