WhatsApp लवकरच सादर करणार multi-device support हे नवे फिचर; पहा काय आहे खासियत

व्हॉट्सअॅप एका नव्या फिचरचे टेस्टिंग करत आहे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट असे या फिचरचे नाव असून यामुळे व्हॉट्सअॅप मल्टीपल डिव्हाईसेस वर चालवणे शक्य होणार आहे.

WhatsApp लवकरच सादर करणार multi-device support हे नवे फिचर; पहा काय आहे खासियत
WhatsApp Logo (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे लोकप्रिय अॅप नवनवे फिचर्स सादर करुन आपल्या युजर्संना खुश करत असतं. आता व्हॉट्सअॅप एका नव्या फिचरचे टेस्टिंग करत आहे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट (Multi-Device Support) असे या फिचरचे नाव असून यामुळे व्हॉट्सअॅप मल्टीपल डिव्हाईसेस वर चालवणे शक्य होणार आहे. दरम्यान, या फिचरची सर्वजण खूप काळापासून वाट पाहत होते. व्हॉट्सअॅपचे नवे फिचर ट्रॅक करणाऱ्या WABetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप या फिचरचे टेस्टिंग करत असून व्हॉट्सअॅप मल्टिपल डिव्हाईसेसवर सेटअप असल्यावर सुद्धा कॉल रिसिव्ह होऊ शकतो.

व्हॉट्सअॅपच्या या फिचरबद्दल WABetainfo ने ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप अकाऊंट मल्टी डिव्हाईस वर कॉन्फिंगर करुन व्हॉट्सअॅपच्या कॉल्सची वेगवेगळ्या डिव्हाईसेसवरुन टेस्टिंग चालू आहे. या फिचरची रिलीज डेट अद्याप व्हॉट्सअॅपने रिलीज केलेली नाही. (WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅप मध्ये 7 दिवसानंतर आपोआप डिलीट होणार पाठवलेले मेसेजेस, जाणून घ्या काय आहे हे Disappearing Messages फिचर)

मल्टी डिव्हाईस फिचर अॅक्टीव्हेट झाल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असलेल्या सर्व डिव्हाईसेसवर एकाच वेळी एक मेसेज येईल. त्यासोबत तुम्ही केलेल्या सर्व अॅक्शन्स, रिप्लाय, डाऊनलोड केलेल्या व्हिडिओज आणि इमेजेस सर्व डिव्हाईसवर सिंक राहतील.

यापूर्वी व्हॉट्सअॅपने QR कोड स्कॅन करुन डेक्सटॉपवर व्हॉट्सअॅप चालवण्याचे ड्युअल फिचर सादर केले होते. याच फिचरचे अपग्रेडेट व्हर्जन हे मल्टी डिव्हाईस सपोर्ट हे आहे. या नव्या फिचरवरती व्हॉट्सअॅप जवळपास वर्षभरापासून कार्यरत आहे. (Useful WhatsApp Tip: अनोळखी व्यक्तींद्वारा व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये Add होऊन झाला आहात त्रस्त, 'या' टिप ने तुमच्या परवानगीशिवाय कोणी करु शकत नाही तुम्हाला अॅड)

WABetainfo ने यापूर्वी दिलेल्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप अकाऊंट तुम्ही चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर एकाच वेळी पाहू शकाल. विशेष म्हणजे प्रायमरी डिव्हाईस इंटरनेटला कनेक्टेड नसेल तरी इतर डिव्हाईसेसवर तुम्ही मेसेज सेंड किंवा रिसिव्ह करु शकता.

(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2020 10:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).