दैनंदिन जीवनात WhatsApp चा वापर हा इतक्या मोठ्या प्रमाणावर होतो की हे अॅप आपल्या जीवनातील अविभाज्या घटक बनला आहे असे म्हणायला हरकत नाही. या अॅपमध्ये रोज नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतात. त्यात व्हॉट्सअॅप ग्रुप (WhatsApp Group), स्टेटस (Status), ग्रुप चॅट (Group Chat), ग्रुप व्हिडिओ कॉल (Group Video Call), व्हॉईस कॉल (Voice Call) असे अनेक फिचर्स आलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्यात आलेल्या ग्रुप फिचरमुळे (Group Feature) आपल्या मित्रांशी गप्पा मारणे अगदी सहजसोपे झाले. मात्र काहींसाठी आपल्या परवानगी शिवाय आपल्याला ग्रुपमध्ये अॅड करणे त्रासदायक होऊ लागले आहे. त्याच्यावर काय करता येईल याचा अनेक जण कदाचित विचार करत असतील. तर त्याचे उत्तर तुम्हाला येथे मिळेल.
अनेकदा आपल्यालाओळखीच्या काही ठराविक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड होण्याची अजिबात इच्छा नसते. तर कधी कधी आपला केवळ मोबाईल नंबर सेव्ह असल्यामुळे अनोळखी व्यक्तींकडून आपल्याला ग्रुपमध्ये अॅड केले जाते. ज्याचा आपल्याला नाहक त्रास सहन करावा लागतो. त्रासापासून दूर राहायचे असेल तर पुढील गोष्टी फॉलो करा. WhatsApp वर लवकरच येणार एक नवं फिचर, 5 मिनिटांत गायब होणार मेसेज
1. तुमचे व्हॉटसअॅप अकाउंट ओपन करुन त्याच्या उजवीकडील वर कोप-यात 3 टिंब दिसतील. त्यावर क्लिक करा.
2. त्यानंतर Settings वर क्लिक करा.
3. मग Account वर क्लिक करुन त्यात आलेल्या पर्यायांपैकी Privacy वर क्लिक करा.
4. त्यानंतर तुम्हाला Groups या पर्यायवर क्लिक करावे लागेल.
5. त्यात तुम्हाला 'nobody', 'my Contacts' किंवा Everyone हे पर्याय दिसतील.
6. Nobody हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला कोणीही कोणत्या ग्रुप मध्ये Add करु शकणार नाही. आणि तसे करायचे असल्यास त्याला तुमची परवानगी घ्यावी लागेल.
7. My Contacts हा पर्याय निवडल्यानंतर त्या यूजरच्या कॉन्टेक्ट यादीत असलेल्या कोणत्याही नंबरला ते अॅड करु शकता.
8. तर Everyone हा पर्याय निवडल्यानंतर त्याला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड केले जाऊ शकते.
9. यूजरला ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी एक मेसेज पाठवला जाईल, त्या नंतर यूजरला 3 दिवसाच्या आत त्याचा रिप्लाय द्यावा लागेल अन्यथा ते एक्सपायर होईल.
अशा पद्धतीने तुमच्या व्हॉटसअॅप अकाउंटमध्ये जाऊन सेटिंग्समध्ये बदल केल्यास तुम्हाला कोणीही अनोळखी व्यक्ती तुमच्या परवानगी शिवाय कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही.