![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/06/Whatsapp-784x441-380x214.jpg)
सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्हॉट्सअॅप (WhatsApp) त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच बदलत्या ट्रेन्डनुसार अॅपच्या काही फिचर्समध्ये बदल करतो. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपवरील स्टेटस आता फेसबुकवर सुद्धा पोस्ट करता येणार असल्याचे अपडेट आणले होते. मात्र आता लवकरच व्हॉट्सअॅपवर एक नवं फिचर येणार असून ते स्नॅपचॅट सारखे काम करणारे असणारे आहे. कंपनीने या फिचरला Disappearing Messages असे नाव दिले आहे.
WABetaInfo यांच्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप त्यांचे नव्याने येणारे Disappearing Messages हे फिचर लवकरच रोलआउट करणार आहे. परंतु सर्वात प्रथम हे फिचर WhatsApp Beta यांच्यासाठी उपलब्ध होणार आहे. मात्र याच्या संबंधित अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. व्हॉट्सअॅपवरील या नव्या फिचरमुळे तुमचे मेसेज 5 मिनिटांत गायब होणार आहेत.
रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, Disappearing Messages फिचर हे युजर्सला मेसेज एक्सपायर कधी करावा यासाठी वेळ विचारणार आहे. तसेच त्यानुसार त्याची वेळ सुद्धा सेट करता येणार आहे. यामध्ये 5 ते 1 तासापर्यंतचा कालावधी देण्यात येण्याची शक्यता आहे. परंतु जर तुम्ही या फिचरचा उपयोग करत असल्यास तुमच्या मेसेजसाठीच ते अप्लाय होणार असून कोणत्याही सिलेक्टिव्ह मेसेजसाठी नसणार आहे.(WhatsApp वर व्हायरल होतोय फुकटात Adidas कंपनीचे शूज मिळत असल्याचा मेसेज, युजर्सनी सावध रहा नाहीतर फसवणूक होईल)
तसेच WABetaInfo यांनी माहिती देत असे सांगितले आहे की, हे फिचर वापरत असल्यास डिलिट करण्यात आलेले मेसेज पुन्हा युजर्सला वाचता येणार नाही आहेत. युजर्सला हे फिचर बहुधा आवडणार नाही पण ग्रुप चॅटवर ट्रेस करण्यात येणारे मेसेजची सुविधा बंद होणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपवरील सिक्युरिटी सुद्धा अधिक मजबूत होणार आहे. हे फिचर्स प्रथम अॅन्ड्रॉइडसाठी देण्यात येणार आहे. त्यांनतर आयओएससाठी रोलआउट करण्यात येण्याची शक्यता आहे.