Fake Message on whatsapp (Photo Credits: File Photo)

सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्हॉट्स अॅपवर (WhatsApp) गेल्या काही महिन्यांपासून खोटे मेसेज फार व्हायरल होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या खोट्या मेसेजमुळे काहींना आपला जीव गमवावा लागता आहे तर काहींची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. मात्र व्हायरल होणााऱ्या खोट्या मेसेजला आळा घालण्यासाठी सरकार आणि कंपनीकडून ही काही गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही फेक मेसेजच्या माध्यमातून नागरिकांची होणारी फसवणूक ही काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे. अशाच पद्धतीचा एक मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असून युजर्सला आदिदास (Adidas) या ब्रॅन्डचे शूज फुकटात दिले जात असल्याचा खोटा मेसेज पाठवण्यात येत आहे. त्यामुळे युजर्सने या खोट्या मेसेजला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅपवर युजर्सची फसवणूक करणाऱ्या टोळीकडून आदिदास ब्रॅन्डचे शूज फुकटात दिले जात असल्याचा मेसेज सर्वांना पाठवला जात आहे. त्याचसोबत एक लिंक सुद्धा मेसेजमध्ये दिली आहे. या मेसेजमध्ये आदिदासला 70 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात आदिदासकून 700 शूज आणि 7 हजार टी-शर्ट्स दिले जात असल्याची बतावणी करण्यात येत आहे. मात्र या मेसेजवरील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावध रहावे.

गेल्या वर्षात सुद्धा आदिदासच्या नावाने लोकांची दिशाभूल करत त्यांना फसवण्यात आले होते. त्यावेळी 3000 शूज आदिदासकडून दिले जात असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचसोबत लिंक देत शूज मिळवण्यासाठी क्लेम करण्यास सांगण्यास येत होते. तर आदिदास ही एकमेव कंपनी आहे जी फसवणूकीच्या विळख्यात अडकली गेली आहे. यापूर्वीही आदिदासच्या नावाचे युजर्सची फसवणूक करण्यात आल्याची प्रकरणे समोर आली होती.(सणाच्या काळात कोणत्याही ऑनलाईन सेलमधून वस्तू घेण्यापूर्वी जाणून घ्या 'या' गोष्टी, नाहीतर फसवणूक होईल)

खरंतर युजर्सला ऑफर्ससंबंधित मेसेज पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा मुख्य प्लॅन स्कॅमर्सकडून करण्यात येतो. त्यामुळे जर तुमच्या मेसेजवर किंवा व्हॉट्सअॅपवर अशा प्रकारचे खोटे मेसेज आल्यास त्यापासून दूर रहा. कारण या मेसेजमध्ये युजर्सची वैयक्तित माहिती मागितली जात असून त्यांची फसवणूक होण्याची फार शक्यता असते.