सध्या देशभरात विविध सणांना सुरुवात होणार असून ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करण्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. तर फेस्टिव्ह सीझनमध्ये ऑनलाईन सेलमझधून वस्तू खरेदी करुन काही ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत. भारतात 2014 नंतर ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेन्ड अधिक वाढत गेला. तर येत्या दोन-तीन दिवसात अॅमोझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) वर फेस्टिव्ह सीजन सेल (Festive Season Sale) सुरु होणार आहे. 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर दरम्यान या दोन्ही इकॉमर्स वेबसाइटवर फेस्टिव्ह सीजन सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये बरेच इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्ससह फॅशन, होम अप्लायंसेज पर्यंतच्या सर्व गोष्टींवर सुट देण्यात येणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्याचा व्यवहारामुळे जगभरातील मोठ्या कंपन्या मधील वॉलमार्ट, अलीबाब, अॅमेझॉन या भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र सरकारकडून गेल्या वर्षात 30 जुलैला ऑनलाईन सेक्टरच्या नियमाबाबत एक पॉलिसी बनली आहे. या पॉलिसीनुसार ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीपासून वाचणे हा महत्वाचा मुद्दा आहे. तर ऑनलाईन सेलमधून वस्तू घेण्यापूर्वी जाणून घ्या 'या' गोष्टी नाहीतर फसवणूक होण्याची फार शक्यता असते.
-प्रोडक्ट रेटिंगमुळे गोंधळू नका
बहुतांश ग्राहक ऑनलाईन शॉपिंग करताना एखाद्या प्रोडक्टसाठी किती रेटिंग दिली आहे हे तपासून पाहतात. जर रेटिंग उत्तम असेल तर ग्राहक खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र ऑनलाईन साईटवर प्रोडक्टबाबत देण्यात आलेली रेटिंग काही वेळेस फेक असतात. काही ग्राहक ऑनलाईन खरेदी करताना त्याचा रिव्हू किंवा फोटो पाहूनच ती वस्तू खरेदी करतात. मात्र असे केल्यास काही वेळेस खरेदी केलेले प्रोडक्टस उत्तम दर्जाचे नसल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत ती वस्तू परत देण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या नाटक करतात.
-रिप्लेसमेंट पॉलिसीबाबात जाणून घ्या
जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेली वस्तू ग्राहकाकडून परत केली जाते. त्यानंतर ग्राहकाला 14 दिवसात त्या वस्तू बाबत रिफंड देणे अनिवार्य आहे. त्याचसोबत 30 दिवसाच्या आतमध्ये ग्राहकांच्या तक्रारीवर तोडगा काढणे सुद्धा गरजेचे आहे. तसेच ज्या व्यक्तीकडून तुम्ही प्रोडक्ट खरेदी करत असल्यास त्याला त्याची संपूर्ण माहिती देणे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने रिप्लेसमेंट पॉलिबाबत अधिक जाणून घेणे अत्यावश्यक आहे.(Flipkart 'The Big Billion Days Sale': 29 ते 4 ऑक्टोबरला असणार फ्लिपकार्टचा मेगा सेल, गॅजेट्ससह घरगुती वस्तूंवर मिळणार आकर्षक सूट)
तसेच प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी अन्य ठिकाणी सुद्धा त्याबाबत अधिक माहिती घ्या. तर कोणत्याही ब्रॅन्डची वस्तू खरेदी करत असल्यात त्याच्या शॉपिंग पोर्टल किंवा जागेची माहिती घ्या. त्याचसोबत खरेदी करणाऱ्या वस्तूचा ब्रॅन्ड विश्वासनीय असेल तरच खरेदी करा. एवढेच नाही Amazon आणि Flipkart या दोन्ही कंपन्यांकडून ऑनलाईन पद्धतीने खरेदी करत असल्यास त्यांच्या रिर्टन पॉलिसीबाबत जाणून घ्या.