Flipkart 'The Big Billion Days Sale': 29 ते 4 ऑक्टोबरला असणार फ्लिपकार्टचा मेगा सेल, गॅजेट्ससह घरगुती वस्तूंवर मिळणार आकर्षक सूट
Flipkart Big Billion Sale (photo Credits: Flipkart)

साधारणत: गणेश चतुर्थी नंतर साधारणत: सणांचा मौसम सुरु होता. आणि मग सर्वांची पाऊले आपोआप शॉपिंगकडे वळतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्राहकांना आपला सण आनंदात आणि उत्साहात साजरा करता यावा यासाठी ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट (Flipkart) नवीन जम्बो सेल घेऊन येत आहे. 'द बिग बिलियन डेज सेल' (The Big Billion Days) असे याचे नाव असून 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. यात तुम्हाला मोबाईल, कॅमेरा यांसारख्या गॅजेट्ससह घरगुती वापरातील वस्तूंवरही आकर्षक सूट मिळणार आहे. यात 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत कपडे, घरगुती वस्तू, सौंदर्यप्रसाधने, खेळणी, फर्निचर यांसारख्या वस्तूंवर आकर्षक सूट मिळणार असून 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान मोबाईल्स, टॅबलेट्स, यांसारख्या गॅजेट्सवर आकर्षक सूट मिळणार आहे.

या सेलमध्ये Axis Bank च्या डेबिट तसेच क्रेडिट कार्ड धारकांना तसेच ICICI Bank च्या क्रेडिट कार्डधारकांना त्वरित अतिरिक्त 10% सूट मिळणार आहे. चला तर पाहूया या सेलमध्ये काही आकर्षक ऑफर्स:

1. Samsung S9

मूळ किंमत: 70,000 रुपये

ऑफर किंमत: 34,999 रुपये

2. Onida 6.2Kg वॉशिंग मशीन (Fully Automatic)

मूळ किंमत: 19,990 रुपये

ऑफर किंमत: 10,999 रुपये

3. Acer Aspire 5S

मूळ किंमत: 64,999 रुपये

ऑफर किंमत: 39,990 रुपये

हेदेखील वाचा- खुशखबर! आता Flipkart वर पाहू शकणार मोफत चित्रपट आणि वेबसिरीज; Amazon Prime समोर तगडे आव्हान

4. Redmi Note 5

मूळ किंमत: 10,999 रुपये

ऑफर किंमत: 7,499 रुपये

5. JBL स्पीकर्स

मूळ किंमत: 9,999 रुपये

ऑफर किंमत: 3,999 रुपये

हेही वाचा- Flipkart Credit Card: फ्लिपकार्टने लॉन्च केलं नवं क्रेडिट कार्ड; खरेदीवर ग्राहकांना मिळणार 'या' सवलती

6. Juicer मिक्सर

मूळ किंमत: 6,500 रुपये

ऑफर किंमत: 2,699 रुपये

या आणि यांसारख्या अनेक गॅजेट्स आणि घरगुती उपकरणांवर फ्लिपकार्ट च्या 'द बिग बिलियन डेज' मध्ये आकर्षक सूट मिळणार आहे. तसेच कपडे, सौंदर्यप्रसाधने, फॅशन संबंधित वस्तूंवर देखील जम्बो ऑफर या सेलमध्ये मिळणार आहे.