Flipkart (Photo Credits: File Photo)

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट नेहमीच ग्राहकांसाठी नवनव्या सुविधा, ऑफर्स सादर करत असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फ्लिपकार्टने आता नवी सुविधा ग्राहकांसाठी सुरु केली आहे. फ्लिपकार्टने अॅक्सिस बँक आणि मास्टरकार्ड यांच्याशी हातमिळवणी करत आपल्या ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड लॉन्च केलं आहे. या क्रेडिट कार्डमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन शॉपिंगवर 5% पासून अनलिमिटेड कॅशबॅक दिलं जात आहे. तसंच इतर अनेक सुविधाही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. (15 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरु होतोय धमाकेदार सेल, पाहा कोणत्या आहेत आकर्षक ऑफर्स)

नवं क्रेडिट कार्ड घेण्यासाठी:

फ्लिपकार्टचं नवं क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुम्हाला 500 रुपये भरावे लागतील. त्याचबरोबर वर्षाला 2 लाख रुपयाच्या खरेदीवर वर्षाचा चार्ज माफ केला जाईल. तसंच ग्राहकांचा कॅशबॅक स्टेटमेंटमध्ये ऑटो क्रेडिट होईल.

कॅशबॅक ऑफर्स:

फ्लिपकार्ट-अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे कंपनीचे को-ब्रँड मर्चंटद्वारे फ्लिपकार्ट, Myntra आणि 2GUD येथून सामान खरेदी केल्यास ग्राहकांना 5% कॅशबॅक मिळेल.

तर Make My Trip, Uber, PVR, Urban Clap, Curefit यावरुन काही खरेदी केल्यास 4% कॅशबॅक मिळेल. इतर सर्व मर्चंटच्या खरेदीवर कार्डहोल्डरला 1.5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल.

तसंच क्रेडिट कार्डावर वेल्कम बेनिफिटही दिला जाईल. को ब्रँडेड मर्चंट्स आणि थर्ड पार्टी प्लॅटफाॅर्मवरुन खरेदी केल्यास 3 हजार रुपये मिळतील. त्याचबरोबर ग्राहकांना देशातील रेस्टॉरन्टमध्ये 20% सवलत मिळेल आणि 1.5% कॅशबॅक मिळेल. ग्राहकांना दर महिन्याला इंधनाच्या चार्जवर 500 रुपये सूट मिळेल.