Flipkart's Big Billion Days Sale 2023: तुम्ही काही ऑनलाईन वस्तू खरेदी करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी आनंदाचा तोफा आहे. भारतातली एक अग्रणीय इ-कॉमर्स अथवा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कंपनी फ्लिपकार्ट आपला खास असा भव्य दिव्य बिग बिलियन डेज सेल 2023 घेऊन येत आहे. लवकरच या सेलची सुरुवात होईल. ज्यामध्ये Apple, iQoo, OnePlus, Samsung, Realme आणि Xiaomi, अॅक्सेसरीज, वेअरेबल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स सारख्या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर खरेदीदारास घसघशीत सूट मिळू शकेल. खास करुन इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत सवलत सुद्धा मिळू शकणार आहे. याशिवाय, खरेदीदार विक्रीदरम्यान सवलत, कॅशबॅक, नो-कॉस्ट ईएमआय ऑफर, क्रेडिट आणि एक्सचेंज डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात. प्रत्येक खरेदीसह सुपरकॉइन्स मिळवण्याची किंवा रिडीम सुद्धा देण्यात येणार असल्याचे समजते.
बिग बिलियन डेज सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 80% सवलत
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, हा सेल पुढच्या महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच यंदाच्या वर्षी या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन, कॉम्प्युटर पेरिफेरल्स, टॅबलेट, स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिनवर 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. याशिवाय, या विक्रीत फॅशन आणि सौंदर्य, गृह सजावट, फर्निचर आणि बरेच काही यासह श्रेणींमध्ये 90 टक्क्यांपर्यंत किमतीत कपात केली जाऊ शकते.
विवो, सॅमसंग आणि मोटोरोला सारखे ब्रँड भेटीला
दरम्यान, सांगितले जात आहे की, फ्लिपकार्टच्याआगामी बिग बिलियन डेज सेल इव्हेंटमध्ये विवो, सॅमसंग आणि मोटोरोला या ब्रँड्सच्या सहा नवीन उत्पादने लॉन्च केली जाणार असल्याची पुष्टी केली जात आहे. याशिवाय Motorola Edge 40 Neo, Vivo T2 Pro, आणि Samsung Galaxy S21 FE 2023 चे नवे व्हर्जनही ग्राहकांच्या भेटीला येऊ शकते, असा दावा केला जात आहे.
दरम्यान, फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलसह, प्लॅटफॉर्म लॅपटॉप आणि स्मार्टवॉचवर 50 ते 80 टक्के सूट देण्याचे आश्वासन देत आहे. दरम्यान, इयरफोनची किंमत 499 रुपयांपासून आणि कीबोर्डची किंमत 99 रुपयांपासून सुरू होईल. वाइडस्क्रीन मॉनिटर्सवर 70 टक्के सवलत असेल आणि प्रिंटरला 60 टक्के सवलत मिळेल. जे लोक सवलतीच्या दरात टीव्ही आणि इतर उपकरणे खरेदी करण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम संधी असू शकते कारण Flipkart या वस्तूंवर 80 टक्के सूट देणार असल्याचे सांगतो आहे.